Thursday, October 1, 2026
HomeनगरAhilyanagar : टंचाई काळात मुख्यालय सोडू नका

Ahilyanagar : टंचाई काळात मुख्यालय सोडू नका

जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांचे आदेश

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

यंदा पावसाच्या मोठ्या तुटीमुळे नगर जिल्ह्यात पाणी टंचाईचे मोठे संकट उभे राहण्याचे चिन्ह आहेत. यामुळे टंचाई काळात अधिकार्‍यांनी मुख्यालय सोडू नये, येत्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील टंचाई निवारणार्थ कृती आराखडा सादर करावा. वीज बिल थकीत असले तरी ग्रामीण भागात पाणी योजनांचे वीज कनेक्शन महावितरणने तोडू नये असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मंगळवारी दिले.

- Advertisement -

नगरला टंचाई आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते. यावेळी त्यांनी सुरुवातीला तालुकानिहाय झालेला पाऊस आणि सद्य परिस्थितीत उपलब्ध पाणी आणि जनावरांचा चारा याबाबत आढावा घेत जिल्हा प्रशासनासह तालुक्याचे अधिकार्‍यांना सूचना दिल्या. नगर जिल्ह्यात 131 महसूल मंडळे असून 15 ठिकाणी नगरपंचायत एक महानगरपालिका आणि 1 हजार 330 ग्रामपंचायती तर 1 हजार 610 गावे असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 67.5 टक्के पाऊस झालेला असून राहुरी, श्रीरामपूर आणि राहाता तालुक्यात पावसाचे हे प्रमाण 40 टक्क्यांच्या आत आहे. उर्वरित तालुक्यातील पावसाचे प्रमाण असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

जिल्ह्यातील 79 लघु प्रकल्पामध्ये सध्या 50.45 टक्के तर सहा मध्यम प्रकल्पात 39.54 टक्के यासह तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये 85.55 टक्के पाणीसाठा असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यात भंडारदरा धरणात 100 टक्के, निळवंडे 89 टक्के तर मुळा धरणात 78 टक्के पाणी साठा असल्याचे सांगण्यात आले. बैठकीत जिल्हाधिकारी यांनी तालुकानिहाय उपलब्ध चारा आणि चारा पिकांचे नियोजन जाणून घेतले. सध्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या वतीने टंचाई निवारणार्थ टंचाईकृती आराखडा तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. हा आराखडा तातडीने पूर्ण करत येत्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तो मान्यतेसाठी सादर करावा, अशा सुचना डॉ. आशिया यांनी दिल्या.

जिल्ह्यासह तालुका पातळीवर पाणी पुरवठा आणि टंचाईशी निगडीत अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नयेत, सर्व शासकीय विभागाने समन्वयाने काम करावे, विशेष करून महावितरण यांनी शेतकरी व अन्य ग्राहकांशी सौजन्याने वागावे, टंचाई आरखड्यातील 1 ते 11 उपाययोजनांना प्राधान्य देण्यात यावेत, जनावरांचा चारा आणि पाण्याची व्यवस्था करावी, जिल्ह्यात सध्या उपलब्ध होणारा चारा याबाबत जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी आढावा घेतला. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पाणी पुरवठा विभाग, पशूसंवर्धन विभाग आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

रोहयोची कामे तयार ठेवा- भंडारी
जिल्ह्यात रोजगार हमी विभागाच्या वतीने राबवण्यात येणार्‍या रोहयोच्या सेल्फवर कामे मंजूर करून ठेवावी, जिल्ह्यात मागेल त्याला तातडीने कामे उपलब्ध करून देता आली पाहिजे. यासह टंचाईकृती आराखड्यात तातत्पूर्त्या पाणी योजनांसह पाणी योजनाच्या विशेष दुरूस्तीची कामे घ्यावी, अशी सुचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज घेण्यासाठी झुंबड; दाखल करणार्‍यांची मात्र प्रतीक्षा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, अर्जांची विक्री मोठ्या प्रमाणात होत...