मुंबई | Mumbai
भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेचे (ICC World Cup) वेळापत्रक काल मंगळवार (दि.२७) रोजी बीसीसीआयकडून (BCCI) अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, या विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतीय संघ चार देशांविरुद्ध मालिका खेळणार आहे. यामध्ये आयर्लंड दौऱ्याचा (Ireland Tour) समावेश असून दोन्ही संघांमध्ये तीन टी २० सामने होणार आहेत….
Maharashtra Rain Update : राज्यात आज मुसळधार-अतिमुसळधार पावसाची शक्यता; नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
भारत आणि आयर्लंड (India vs Ireland) यांच्यातील पहिला सामना १८ ऑगस्ट रोजी होणार असून दुसरा सामना २० ऑगस्टला खेळविण्यात येणार आहे. तर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना २३ ऑगस्ट रोजी होणार असून हे सर्व सामने मालाहाइड (Malahide) येथे खेळविण्यात येणार आहेत. या सर्व सामन्यांना भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडेसात वाजता सुरुवात होणार आहे.
ICC World Cup 2023 : सेमीफायनलमध्ये कोणते चार संघ खेळणार? सेहवागचं मोठं भाकीत
दरम्यान, गेल्यावर्षी भारतीय संघाने (Indian Team)हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वामध्ये दोन सामन्यांची टी २० मालिका खेळली होती. या मालिकेमध्ये (Series) भारतीय संघाने दोन शून्य असे यश संपादन केले होते. यातील पहिला सामना भारतीय संघाने सात खडी राखून तर दुसरा सामना चार धावांनी जिंकून मालिका विजय साकारला होता.
सलिल परांजपे, नाशिक
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...
पुण्यातील तरुणीवर कोयत्याने हल्ला, राज ठाकरेंनी टोचले सरकारचे कान; म्हणाले, “दर्शना पवारसारखा…”