कोर्हाळे |वार्ताहार| Korhale
शिर्डी बायपास रस्त्यावर (Shirdi Bypass Road) अपघातांचे सत्र सुरू असतानाच कोर्हाळे गावाजवळील वाळकी फाट्यावर शुक्रवारी सकाळी लुना गाडी व श्रीगणेश शैक्षणिक संकुलाच्या स्कूल बसच्या अपघातात (Bike and School Bus Accident) वाळकी येथील वृध्द महिला नाणुबाई तात्याबा पवार यांचा मृत्यु (Death) झाला आहे. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता श्रीगणेश संकुलाच्या विद्यार्थ्यांची बस कोर्हाळे बायपास मार्गे मुलांना घेऊन जात होती. वाळकी फाट्यावर आली असता वाळकी गावातील तात्याबा तुकाराम पवार हे पत्नी नानुबाई पवार यांना लुना गाडीवर घेवून रेशन भरण्यासाठी जात होते.
कोर्हाळे बायपास क्रॉस करत असताना अचानक समोरून श्रीगणेश शाळेची पिवळ्या रंगाची स्कूल बस (क्रमांक 17 बी वाय 0218) अचानकपणे समोरून जोरात येऊन धडक (Hit) दिली. त्यामुळे नानूबाई व पती तात्याबा हे रस्त्यावर खाली पडले. अपघात होताच दोघांनाही श्री साईबाबा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. याविषयी राहाता पोलीस ठाण्यात (Rahata Police Station) मयत महिलेचा मुलगा सखाराम तात्याबा पवार यांनी ही फिर्यादी दिली आहे. परंतु रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा शनिवारी मृत्यू (Death) झाला. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण व बीट हवालदार नरोडे हे करत आहे.
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली असून लहान मुलांच्या जीविताशी धोकादायक असणार्या बेदरकारपणे स्कूल बस चालवणार्या वाहन चालकावर कडक करण्यात यावी अशी मागणी परिसरातून करण्यात येत आहे.