Saturday, May 4, 2024
Homeनगरशाळा बंद मात्र अन्य शुल्क पालकांच्या माथी

शाळा बंद मात्र अन्य शुल्क पालकांच्या माथी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व शाळा बंद असून सध्या शाळेच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे.

- Advertisement -

मात्र, शाळेकडून अन्य उपक्रमाच्या नावाखाली अवाजवी ‘फी’ ची मागणी केली जात असल्याच्या निषेधार्थ एका नॅशनल स्कूलच्या प्रवेशद्वारासमोर पालकांनी निदर्शने केली. तर करोनाच्या संकटकाळात ज्या सुविधा शाळेकडून दिल्या जात नाहीत त्याचे शुल्क न आकारता फक्त ऑलनाईन ट्युशन फी आकारण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी तक्रारदार पालक वैभव बोराडे, आदीनाथ गिते, गोरक्षनाथ सातपुते, गणेश सांगळे, रामदास ससे, मनीष साळवी, रिझवान शेख, संतोष वारुळे आदि उपस्थित होते. करोनामुळे शाळा बंद असल्याने शहरातील या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे.

तर शाळेच्या इतर उपक्रम पूर्णपणे बंद आहे. शाळेमधून फी भरण्यासाठी वारंवार फोन किंवा मेसेज येत असून 5 नोव्हेंबरपर्यंत पैसे भरले नाही तर ऑनलाइन शिक्षण बंद होईल असे सांगण्यात येत आहे. पालकांकडे शुल्क भरण्यासाठी तगादा सुरु आहे.

शालेय फी मध्ये शिक्षकेतर कर्मचार्‍याचा पगार, शाळेचा देखभाल खर्च, खेळाच्या साहित्याची फी आदि इतर उपक्रमाचा शुल्काचा समावेश आहे. करोनामुळे सर्व पालकांची आर्थिक स्थिती बिकट असून, पालक शाळेची संपुर्ण फी भरण्याच्या मानसिक स्थितीमध्ये नाही. शाळेने इतर उपक्रमाचे शुल्क पालकांवर लादू नये.

पालकांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी यावर्षी शाळेने फक्त ऑनलाईन ट्युशन फी घ्यावी, ज्या सुविधा शाळा देत नाहीत या सुविधेची फी त्यांनी आकारु नये, असे तक्रारदार पालक वैभव बोराडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या