Saturday, July 27, 2024
Homeनगरमागण्या मान्य झाल्याने शालेय स्पर्धेचा मार्ग मोकळा

मागण्या मान्य झाल्याने शालेय स्पर्धेचा मार्ग मोकळा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शालेय स्पर्धा आयोजनातील मागील वर्षाची रक्कम, तालुका प्राविण्य प्रमाणपत्र, स्पर्धेसाठी आवश्यक असणारी अग्रिम याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळालेल्या आश्वासन यामुळे शालेय क्रीडा स्पर्धेवर शारीरिक शिक्षकांनी टाकलेला असहकार स्थगित करण्यात आला आहे. यामुळे आता शालेय क्रीडा स्पर्धेच्या ऑनलाईन प्रवेशिका भरण्यास सुरु करण्यात येणार असून क्रीडा कार्यालयाकडून लेखी मंजुरी मिळाल्यानंतर 21 ताखेपासून शालेय क्रीडा स्पर्धा सुरु करण्याबाबत समन्वय समितीने निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

जिल्हा क्रीडा परिषदेची जिल्हाधिकारी यांचे दालनात झालेल्या बैठकीत आंदोलकांच्या मागण्या मान्य करताना शासन निर्णयासअधीन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी मंजुरी दिली. यावेळी क्रीडा विकास परिषदेचे सदस्य शिवछत्रपती पुरस्कारार्थी प्रा. सुनिल जाधव, शारीरिक शिक्षक संघटनेचे निमंत्रित नगर तालुकाध्यक्ष महेंद्र हिंगे, राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी समर्थपणे बाजू मांडली, तसेच मागण्या मान्य केल्याने जिल्हाधिकारी सालीमठ यांचे आभार मानले. बैठकीत मागील वर्षीचे स्पर्धा आयोजन खर्चाचे अनुदान, शालेय क्रीडा स्पर्धा पंच मानधन दुप्पट करण्यात येऊन तालुकास्तर 300, जिल्हास्तर 400, राज्यस्तर 500 रुपये प्रतिदिन, मागील वर्षीचे तालुका प्राविण्य प्रमाणपत्र प्रिटेंड देणे, तालुका प्रवेशिका भरून झाल्यानंतर लगेच स्पर्धा आयोजनासाठी अग्रिम रक्कम, क्रीडा संकुलातील व स्पर्धेसाठी आवश्यक सुविधा व साहित्य पुरविण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जिल्हा क्रीडाधिकारी यांनी दिले.

बैठकीत थकित अनुदान, मैदाने व सुविधेतील त्रुटी या बाबत जिल्हाधिकारी यांनी क्रीडा अधिकारी यांची कान उघडणी केली. तसेच क्रीडा संकुलात सिंथेटिक मैदाने, ट्रॅक, टर्फ विकेटयासह क्रीडा संकूल याबाबत क्रीडा मंत्री यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले. बैठकीस जिल्हाधिकारी सालीमठ, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, प्रा. सुनिल जाधव, राजेंद्र कोतकर, महेंद्र हिंगे, ज्ञानेश्वर खुरांगे, विशाल गर्जे, शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे, दिलीप काटे, बापुराव होळकर, प्रकाश मोढे, उन्मेश शिंदे, सुहास भोसले, नितीन निकम, प्रशांत होन, सुनिल आहेर, राजेंद्र शिरसाठ, पोपट काळे, नारायण पाटील, हिम्मतराव खडके, योगेश उगले, प्रल्हाद साळुंके, बापूराव गायकवाड, निवृत्ती घुले, जिल्हा अध्यक्ष सुनिल गागरे, सचिव शिरीष टेकाडे, घनश्याम सानप, अजित वडवकर, शंकरराव बारस्कर आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या