जळगाव Jalgaon
जिल्ह्यासह शहरातील प्राथमिक शाळा (Primary School), जिल्हा परिषदेच्या शाळा (Zilla Parishad School)ह्या दि. 15 जून पासून सुरु (Started)झाल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांमध्ये (parents and teachers) मोठा उत्साह (Great excitement) दिसून आला. बँडच्या गजरात (band’s alarm) विद्यार्थ्यांचे (students) औक्षण करुन त्यांना गुलाबपुष्प देत त्यांचे स्वागत (Welcome) करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसाठी शाळेमधील प्रत्येक वर्ग आकर्षक फुगे, चित्र, रंगीत पताके यांनी सजविण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शाळा व्यवस्थापनाकडून खबरदारीच्या उपाययोजना देखील करण्यात आल्या आहेत.
काशिनाथ पब्लिक स्कूल
विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पब्लिक स्कूल मध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या परिसरात सुंदर फुलांची सजावट करण्यात आली होती. शाळेच्या प्रवेशद्वारावरच सुंदर व आकर्षक अशी रांगोळी व फुग्यांची कमान बनवण्यात आली होती आणि विद्यार्थ्यांनी त्यामधून प्रवेश करतांना त्यांचे औक्षण करून त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. याशिवाय शाळेच्या प्रांगणामध्ये फुग्यांनापासून तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटमध्ये वर्गशिक्षकांसोबत त्या वर्गातील विद्यार्थ्यांचे फोटो काढण्यात आले. प्राचार्य गणेश पाटील यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.
ए.टी.झांबरे विद्यापलयात पाठ्यपुस्तके वाटप
ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठयपुस्तकांचे वितरण करण्यात आले. गट शिक्षणाधिकारी पठाण यांच्या हस्ते इयत्ता 1ली ते 8 वि च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी केसीई सोसायटी चे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर , शालेय शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी , मुख्याध्यापिका रेखा पाटील, प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक नरेंद्र पालवे आदी उपस्थित होते.
मिल्लत हायस्कूलमध्ये
विद्यार्थ्यांचे स्वागत
मिल्लत हायस्कूल, मेहरूण, जळगाव येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळेत आलेल्या सर्व नवीन व जुन्या विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पर्यवेक्षक ताजुद्दीन, मुख्यध्यापिका अफिफा शाहीन, सय्यद मुख्तार,जुबेर,नसीमा, सय्यद आसिफ, वसिम पठाण, आदींच्या हस्ते विद्यार्थ्यांचे व त्यांचे सोबत आलेले पालकांचे पुष्प देऊन स्वागत कण्यात आले.
जी. एच. रायसोनीत चिमुकल्यांना घोड्याची सवारी
जी. एच. रायसोनी पब्लिक स्कुलची पहिली घंटा वाजली अन् बॅक टू स्कूल साजरे झाले. शाळेचा पहिला दिवस असल्याने काही विद्यार्थी स्कूलच्या व्हॅनने व काही आपल्या पालकांसह मोठ्या उत्साहात स्कुलमध्ये दाखल झाले होते. कार्टुनचे दफ्तर, नवीन वॉटरबॉटल अशा साहित्यांसह विद्यार्थी मोठ्या उत्साहात स्कूलमध्ये उपस्थित झाले होते. सुटीचा मनसोक्त आनंद लुटल्यानंतर बुधवारी स्कुलच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा उत्साह ओसांडून वाहत होता. यानंतर स्कूलमध्ये रेन डान्स, घोड्याची सवारी व गुलाबपुष्प देवून चिमुकल्यांचं स्वागत करण्यात आले. तंत्रज्ञानाचा विचार करता सर्व वर्ग डिजिटल इंटरएक्टीव्ह स्क्रीन केले आहेत, विज्युलायजसनी सुसज्ज आहेत. रायसोनी स्कुलमध्ये कंप्युटर लॅब, लायब्रेरीबरोबर, संगीत, नृत्य, नाटक, योगा, स्केटींग यासमवेतच क्रिडा क्षेत्रातील सर्व स्पर्धा आणि वेगवेगळया प्रकारांमध्ये विद्यार्थी भाग घेतात. तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विध्यार्थ्यांना अधिकाधिक विविध खेळ किंवा विषय शिकवले जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव रायसोनी पब्लिक स्कुलमध्ये तयार करण्यात आला आहे. हा तलाव 13 बाय 26 मीटरचा असून हाफ ऑलिम्पिकच्या धर्तीवर या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय या ठिकाणी बाथरूम, शॉवर, चेजिंग रूम, अत्याधुनिक फिल्टरची सुविधा बसवण्यात आली आहे.
संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांचे औक्षण
संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे पूजन करीत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थी भारावून गेले होते. येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात बुधवारी 15 जून रोजी इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची कोरोना महामारीच्या कारणानंतर दोन वर्षानंतर शाळा उघडली. सकाळी मुख्याध्यापिका शीतल कोळी यांनी प्रवेशद्वारातून मुलांचे पूजन करून त्यांचे स्वागत केले. शिक्षकांनी गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे वर्गात स्वागत केले. स्वागत प्रवेशाचे नियोजन संस्थेचे सचिव तथा उपशिक्षक मुकेश नाईक यांनी केले. यावेळी उज्ज्वला नन्नवरे, आम्रपाली शिरसाट, साधना शिरसाट, रुपाली आव्हाड, स्वाती नाईक, नैना अडकमोल, जयश्री खैरनार, सोनाली जाधव, दीप्ती सोनवणे, प्रियंका जोगी, साक्षी जोगी आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
खेडी-कढोली जि.प. शाळा
खेडी-कढोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. त्याच पद्धतीने शाळापूर्व तयारी मेळावा व निपुन भारत अंतर्गत पालक संपर्क अभियानांतर्गत पालकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी नवागत विद्यार्थ्यांची सजविलेल्या बैलगाडीवर मिरवणूक काढून औक्षण व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. बैलगाडीचे सारथ्य डॉएटचे प्राचार्य अनिल झोपे यांनी केले. यावेळी वरिष्ठ अधिव्याख्याता प्रदीप पाटील उपस्थित होते. मान्यवरांहस्ते विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. प्राचार्य अनिल झोपे यांनी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला गावातील सरपंच किरण नन्नवरे, उपसरपंच रेखा नन्नवरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद बडगुजर, उपाध्यक्ष विलास पाटील, चेतन भोई, श्याम बोरसे यांच्यासह पालक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक अजबसिंग पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अलका पाटील यांनी केले.
शूरपाटणे स्कूल
शूरपाटणे स्कूल आणि अत्रे इंग्लिश मीडियम स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. संगीत शिक्षक सागर चौधरी व कुशराजे पवार यांनी विविध बालगीतांनी विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. शाळेच्या पहिल्या दिवसाचे महत्वाचे आकर्षक ठरले ते म्हणजे सेल्फी पॉइंट, आकर्षक फलकलेखन, रांगोळी, फुगे यांची सजावट करण्यात आली. प्रतिभा देशकर आणि पद्मजा अत्रे यांच्या हस्ते मुलांना खाऊवाटप करण्यात आला.
ज्ञान विकास संस्था
संचलित बहिणाबाई विद्यालय
बहिणाबाई ज्ञान विकास संस्था संचलित प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात प्रवेशोत्सव अतिशय उत्साहाच्या वातावरणात विद्यार्थ्यांचे वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. पहिलाच दिवस असल्याने विद्यालयाचे मुख्याध्यापक टी.एस.चौधरी यांनी विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके व गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. मुख्याध्यापक राम महाजन यांनी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके देऊन यांचे स्वागत केले. पाठ्यपुस्तके गुलाब पुष्प व मिठाई देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी क्रीडा शिक्षण डॉ.विलास नारखेडे, प्रतिभा खडके, डॉ.प्रतिभा राणे, स्वाती कोल्हे, सीमा चौधरी, एस. बी. पाटील, व्ही. टी . पाटील, डी. एस. चौधरी, संतोष सोनार, दुर्गादास कोल्हे, जगदीश नेहते उपस्थित होते प्रास्ताविक पी. पी. चौधरी यांनी केले सूत्रसंचालन आर. एस .वाणी यांनी तर आभार सी. बी. पाटील यांनी मानले.
प्रगती विद्या मंदिर
प्रगती विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत जल्लोषात ढोल तश्याच्या गजरात तहसीलदार नामदेव पाटील यांच्या हस्ते पुष्प देऊन करण्यात आले. पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्याना शाळेत पाळावयच्या सूचना देण्यात आल्या. मधल्यासुट्टी मध्ये शालेय पोषण आहारातर्गत खाऊ देण्यात आला.पहिला दिवस असल्याने त्यांच्याशी परिचय करून घेण्यात आला. संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल यांनी मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले व पालकांशी संवाद साधला. याप्रसंगी मुख्याध्यापिका शोभा फेगडे आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सु.ग.देवकर स्कूल
येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या सु.ग. देवकर प्रायमरी स्कूल आणि शिशुविकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आनंददायी शिक्षणाच्या संकल्पनेची गुढी उभारून मोठ्या जल्लोषात बाळगोपाळांचे पायघड्या टाकून पुष्पवृष्टी करून सनईच्या सुरात औक्षण करून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी फुगे उडवून विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवसाचा आनंद घेतला. या कार्यक्रमास शालेय समिती सदस्य दिलीप मुथा, विद्यासमिती प्रमुख प्रा.शरदचंद्र छापेकर, समन्वयिका लता छापेकर, मुख्याध्यापिका साधना महाजन, शिशुविकास प्रमुख वृषाली दलाल, ज्येष्ठ शिक्षक सुकदेव थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व खाऊ वाटप करण्यात आला. सूत्रसंचालन योगेश वंजारी यांनी तर आभार नंदकिशोर ढोले यांनी मानले.
गुरुवर्य प.वि. पाटील विद्यालय
गुरुवर्य प.वि पाटील विद्यालयात शाळा प्रवेश दिन उत्साहात साजरा करण्यात आला. चिमुकल्या बाल मित्रांना शाळेत शालेय साहित्य तसेच रोपांचे वाटप करून स्वागत करण्यात आले. संपूर्ण शाळा फुगे पताका , रांगोळी , फुले आदी साहित्याने सजवलेली होती. काही विद्यार्थ्यांनी मिकी माऊस तसेच जोकरची भूमिका साकारून इतर विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना शालेय आहारामध्ये गोड शिरा देण्यात आला. विद्यार्थ्यांनी डफाच्या तालावर ठेका धरत नृत्य करून शाळेचा पहिला दिवस आनंदाने साजरा केला. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला तर सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.प्रसंगी केसीई सोसायटी चे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर , शालेय शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक उपस्थित होते.
बालनिकेतन विद्यामंदिर
प्रगती शिक्षण मंडळ संचलित कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिर व नवीन माध्यमिक विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात पार पडला. संस्थाध्यक्ष प्रा.डॉ. युवराज वाणी, उद्योजक भूषण चौधरी, संचालक गोवर्धन पाटील, प्रा. ललिता वाणी, वसंत चौधरी, श्रीकांत चौधरी, वंदन वाणी, मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी, नीलेश नाईक उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. उद्योजक भूषण चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या वर्गखोलीसाठी तीन लाख रुपये देणगी दिल्या निमित्ताने त्यांचा संस्थेतर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन नरेंद्र वारके यांनी केले तर उज्ज्वला जाधव, वंदना नेहेते, रशिदा तडवी, श्रीकांत पाटील, राहुल धनगर, राजेंद्र पवार, सुवर्णा सोनार, संगीता निकम, छाया पाटील, ज्योती सपकाळे, स्वाती याज्ञिक, अनिता जंगले, भूषण बर्हाटे यांनी सहकार्य केले.