Friday, April 25, 2025
Homeक्राईमशालेय विद्यार्थिनीचा विनयभंग; तिघांविरोधात गुन्हा दाखल

शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग; तिघांविरोधात गुन्हा दाखल

नगर तालुक्यातील विद्यालयात घडली घटना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर तालुक्यातील एका गावात एका शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून तीन जणांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विद्यार्थिनीच्या आईने रविवारी (9 फेब्रुवारी) फिर्याद दिली आहे. 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास गावातील विद्यालयात व 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30 वाजता गावातील अंगणवाडीजवळ ही घटना घडली. त्याच गावातील एका अल्पवयीन मुलासह त्याचे वडिल व आणखी एका व्यक्तीविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

फिर्यादीच्या 13 वर्षीय मुलीचा तिच्या वर्गातील अल्पवयीन मुलाने छेड काढून विनयभंग केला. वर्गात बसलेली असताना त्याने तिला मला तू खूप आवडते, असे सांगून तिच्या शरीराला स्पर्श केला आणि मोठमोठ्याने हसत तिला लज्जास्पद वागणूक दिली. तसेच, 8 फेब्रुवारी रोजी संशयित आरोपी मुलाचे वडिल व आणखी एका व्यक्तीने गावातील अंगणवाडीजवळ विद्यार्थिनीला अडवले. तिचे केस धरून मारहाण केली, तोंडावर चापटी मारली आणि धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार इंगळे करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...