Tuesday, March 25, 2025
Homeनगरशाळेतील मुलीला अज्ञात व्यक्तीकडून मारहाण

शाळेतील मुलीला अज्ञात व्यक्तीकडून मारहाण

करजगाव |वार्ताहर| Karajgav

नेवासा (Newasa) तालुक्यातील पानेगाव-करजगाव रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ एका मुलीला अज्ञात व्यक्तीने मारहाण (Beating) केल्याची घटना सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.

- Advertisement -

पानेगाव येथून करजगाव येथे शाळेत येत असताना मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने तिचे तोंड दाबून मारहाण (Beating) केल्याचे सदर मुलीने सांगितले. सदर मुलगी ही करजगाव (Karajgav) येथील एका विद्यालयात शिक्षण घेत आहे. शाळेत आल्यावर तिने शिक्षकांना हा प्रकार सांगितला. शिक्षकांनी पालकांना संपर्क करत शाळेत बोलावून घेतले. या घटनेचे गांभीर्य ओळखुन प्राचार्य व पोलीस पाटील यांनी याबाबत सोनई पोलिसांना (Sonai Police) कळविले.

माहिती कळताच सोनई पोलीस ठाण्याचे (Sonai Police Station) सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी करजगाव येथे येत विद्यालय व घटना झालेल्या परिसरात जाऊन पाहणी केली. विजय माळी यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सूचना देत मार्गदर्शन केले. तसेच पालकांनी व परिसरातील नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन केले. यावेळी पोलिसांनी करजगाव-पानेगाव रोडवर विविध ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीची पाहणी केली. यावेळी शालेय वेळेमध्ये पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...