Wednesday, May 29, 2024
Homeनाशिकबंदीजनांच्या कलागुणांना वाव - पोलिस आयुक्त पाण्डेय

बंदीजनांच्या कलागुणांना वाव – पोलिस आयुक्त पाण्डेय

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashik

मी कारागृह विभागातून बदलूनच नाशिकला आयुक्त म्हणून आलो आहे. त्यामुळे कारागृहाच्या समस्या, बंद्यांचे सामर्थ्य चांगलेच ठाऊक आहे. बंद्यांमध्ये देखील विविध गुण, कौशल्य दडलेलं असते, हे नाशिकरोड कारागृहातील कुशल बंद्यांनी तयार केलेल्या आकर्षक गणेश मूर्तींव्दारे ( Attractive Ganesha idols made by the prisoners ) दिसून येते. नागरिकांचा प्रतिसाद तसेच बंद्यांच्या कलागुणांमुळे बंद्यांना वेगळी उर्जा मिळते, त्यांचा आत्मविश्वास वाढतो, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त दिपक पाण्डेय( Police Commissioner Deepak Pandey ) यांनी केले.

- Advertisement -

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील ( Nashik Road Central Jail) बंद्यांनी तयार केलेल्या गणेश मूर्तीची विक्री व प्रदर्शनाचे उदघाटन आयुक्त पाण्डेय यांनी आज सायंकाळी केले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, कारागृह अधिक्षक प्रमोद वाघ, सीआयएसएफचे कमान्डंट भारव्दाज, कारागृह सचिव सुशील पाटील, वरिष्ठ कारागृह अधिकारी अशोक कारकर, टी.एस. निंबाळकर, शाम गिते, संपत आढे, अभिजीत कोळी, पोलिस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त समीर शेख, शशिकांत दिवे, नगरसेवक विशाल संगमनेरे, मंदा फड, योगेश देशमुख, विक्रम खरोटे, पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, निलेश माईनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना पोलिस आयुक्त पाण्डेय म्हणाले की, बंद्यांनी तयार केलेल्या शाडूमातीच्या गणेश मूर्तींची नागरिकांनी आपल्या घरी प्रतिष्ठापना केली तर पर्यावरण रक्षणाचा हेतू साध्य तर होईलच परंतु, बंद्यांनाही चार पैसे मिळतील. उपमहानिरीक्षक योगेश देसाई म्हणाले की, पर्यावरणपूरक गणेश मूर्तींवर करण्याचेच कारागृहाचे पूर्वीपासून धोरण राहिले आहे. 2018 पासून येथे गणेश मूर्ती काम सुरु झाले. करोना संकटामुळे गेल्या वर्षी 550 तर यंदा 500 मूर्तीच तयार करता आल्या. नागरिकांच्या प्रतिसादामुळे बहुतांश मूर्ती बुक झाल्या आहेत.

दरम्यान यंदाच्या गणेश मूर्ती बंदी अशोक घरट, बापू साळुंके, शंकर हारे, फुलाराम मेघवाल, विकास घुरूप, महेंद्र मिद, मिल तेरवा, वजीर बादेला, रोहिदास रघुटारे आदींनी यंदा तयार केल्या. गणेश मूर्तींमुळे नाशिकरोड कारागृहाला 2018 साली 13 लाख, 2019 साली 11 लाख महसूल मिळाला. तथापी, करोनाच्या महामारीचा कारागृहाच्या महसूलावर परिणाम झाला. त्यामुळे 2020 साली महसूल 7 लाख मिळाला. यंदा 2021 साली 500 मूर्तीतून 7 लाख महसूल अपेक्षित आहे. दगडूशेठ, लंबोदर, गजमुख, बालाजी, मूषक वाहन, मोरेश्वर, टिटवाळा, गादी आसन, राधाकृष्ण, शंकर पार्वती आदी स्वरुपातील गणेश मूर्तींना चांगली मागणी आहे. कार्यक्रमानंतर नागरिकांनी मूर्ती खरेदी व मूर्ती पाहण्यासाठी गर्दी केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या