Thursday, September 12, 2024
Homeनगर‘मग’ से दिल तक !... शिल्पकार कांबळेंचा रसिकांसाठी अनोखा संग्रह

‘मग’ से दिल तक !… शिल्पकार कांबळेंचा रसिकांसाठी अनोखा संग्रह

अहमदनगर | Ahmednagar

‘मग’ (Mug) म्हणजे तुमच्या आमच्या परिचयातील चहाच्या कपाचं (cup of tea) सुधारित किंवा मोठं भावंड. जरा विचार करा, यातही काही कलात्मकता असेल का? पारखी नजर असेल तर ती नक्की सापडेल. याचाच प्रत्यय नगरचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे (Sculptor Pramod Kamble) यांनी पुन्हा एकदा दिलाय. त्यांनी जगभरातून संकलीत केलेल्या ‘मग’चा संग्रह रसिकांसाठी खुला केला आहे. आपल्या वैशिष्ट्यांमुळे ही कलात्मकता ‘मग से दिल तक’ पोहचली नाही तर नवल!

- Advertisement -

नगरचे व्यापारी म्हणतात, बाजारपेठेत समाधानाची झुळूक!

गुलमोहोर रोडवरील (Gulmohar Road) स्टुडिओत कलारसिकांसाठी असलेल्या या ‘मग’ कलादालनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले (Collector Rajendra Bhosale) व हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार (Popatrao Pawar) यांनी केले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil), उदयोजक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodiya), आरटीओ दीपक पाटील (RTO Dipak Patil), डॉ.रविंद्र साताळकर (Dr Ravindra Satalkar) आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली. देश विदेशातील 1 इंच ते 20 लिटर क्षमता असलेले असे सुमारे अडीच हजार मगचा हा संग्रह (Mug collection) आहे. या संग्रहाच्या माध्यमातून पर्यटकांना (tourists) प्रेरणा मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी भोसले यांनी व्यक्त केला. तर पोपटराव पवार म्हणाले, कांबळे यांचे हे ‘मग’ कलेक्शन नगरच्या वैभवात भर टाकेल.

काही वर्षापूर्वी मी मुंबईला (Mumbai) जगप्रसिध्द कलाकार पाब्लो पिकासो (Pablo Picasso) यांच्या कलाकृतीचे प्रदशनात पिकासोची स्वाक्षरी (Pablo Picasso Signature) असलेला मग विकत घेतला व तेथून ‘मग’ संकलनाची कल्पना सुचली. धातू, सिरॅमिक, काच, टेराकोटा, पत्रा, कागद अश्या विविध माध्यमातील आकार, रंग रूपाचे वैशिष्टयपूण असे जवळपास अडीच हजार ‘मग’चा हा ठेवा स्वतंत्र दालनाच्या माध्यमातून कलारसिकांसाठी खुला करताना आनंद होत आहे. यानिमित्त नगरकरांना कलेची वेगळी मेजवानी मिळेल. कदाचित हे भारतातील पहिलेच वैशिष्ट्यपूर्ण ‘मग’ दालन असावे.

– प्रमोद कांबळे

सचिनची सही अन् रंगबदलू मग…

भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), पंडित हरिप्रसाद चौरसिया (Pandit Hariprasad Chaurasia), तबलानवाज झाकीर हुसेन (Ustad Zakir Hussain), लेखक मंगेश तेंडुलकर (Mangesh Tendulkar), वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) आदी प्रसिद्ध व्यक्तींनी स्वाक्षरी केलेले, 1883 कोकाकोला कंपनीचा (Coca-Cola Company), प्रिन्स चार्ल्स व डायना (Prince Charles and Diana) यांच्या विवाहाप्रीत्यर्थ जे खास मग तयार केले होते त्यापैकी एक येथे आहे. गरम कॉफी टाकल्यावर त्याचा रंग बदलतो, काहीमध्ये गरम पेय टाकल्यावर संगीत सुरू होते, असे वैशिष्टयपूर्ण ‘मग’ या संग्रहात आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या