Friday, October 18, 2024
Homeदेश विदेशउद्योगपती अनिल अंबानी यांना सेबीचा दणका; कोट्यावधींचा दंड ठोठावत 'इतक्या' वर्षांसाठी घातली...

उद्योगपती अनिल अंबानी यांना सेबीचा दणका; कोट्यावधींचा दंड ठोठावत ‘इतक्या’ वर्षांसाठी घातली बंदी

मुंबई | Mumbai
देशातील प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांना सेबीने मोठा दणका दिला आहे. सेबीने अनिल अंबानींवर ५ वर्षांची बंद घातली आहे. त्यामुळे अनिल अंबानींना हा मोठा धक्का असल्याचे सांगण्यात येत आहे. बंदी सह त्यांना २५ कोटींचा दंडही ठोठावण्यात आला आहे. अनिल अंबानी आणि रिलायन्स होम फायनान्सच्या माजी अधिकाऱ्यांसह २४ इतर संस्थांवर इक्विटी मार्केटमध्ये पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

अनिल अंबानींसह इतर २४ कर्मचाऱ्यांनाही २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आली आहे. सेबीने घातलेल्या या बंदीनंतर अनिल अंबानी यापुढे सिक्युरिटी मार्केटमध्ये व्यव्हार करु शकणार नाहीत. सेबीने अनिल अंबानींच्या रिलायन्स होम फायनान्सला ६ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यांच्या कंपनीवर ६ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे.

- Advertisement -

का करण्यात आली कारवाई?
कंपनीमधून फंडचे डायव्हर्जन झाल्याच्या आरोपावरुन सेबीने मोठी कारवाई केली आहे. सेबीने अनिल अंबानी यांना २५ कोटींचा दंड ठोठावला आहे.. यासोबतच रिलायन्स होम फायनान्सवर सहा महिन्यांची बंदी घालण्यात आली असून कंपनीवर ६ लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. सेबीच्या २२ पानांच्या अंतिम आदेशात म्हंटले आहे की, अनिल अंबानी यांनी RHFL च्या प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने RHFL मधील निधी काढून टाकण्यासाठी एक फसवी योजना आखली होती, जी त्याने त्याच्याशी जोडलेल्या संस्थांना कर्ज म्हणून दिल्याचे उघड झाले आहे.

सेबीने काय नमुद केले?
अनिल अंबानींच्या प्रभावाखाली काही प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांनी केलेले हे कृत्य व्यवस्थापनाचे अपयश असल्याचे सिद्ध होत आहे. अनिल अंबानी यांनी ADA समुहाचे अध्यक्ष’ म्हणून आपल्या पदाचा आणि RHFL च्या होल्डिंग कंपनीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण अप्रत्यक्ष शेअरहोल्डिंगचा वापर फसवणूक करण्यासाठी केलाय उर्वरित संस्थांनी एकतर बेकायदेशीरपणे मिळवलेली कर्जे किंवा RHFL कडून पैसे बेकायदेशीरपणे वळवता येण्यासाठी लाभार्थ्यांची भूमिका बजावली आहे, असे सेबीने नमूद केले आहे.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या