Friday, November 22, 2024
Homeदेश विदेशHindenburg Report च्या आरोपांवर सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच काय म्हणाल्या?

Hindenburg Report च्या आरोपांवर सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच काय म्हणाल्या?

दिल्ली । Delhi

भारतात लवकरच काही मोठे घडणार, अशी पोस्ट केल्यानंतर हिंडनबर्ग रिसर्चने (Hindenburg Research) थेट सेबीच्या (SEBI) अध्यक्ष माधवी बुच (Madhabi Buch), त्यांचे पती धवल बुच (Dhaval Buch) आणि अदाणी समूहात (Adani Group) संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. अदाणी घोटाळ्यात ज्या कंपन्यांचे पैसे वापरण्यात आले, त्या दोन्ही परदेशी कंपन्या बनावट असून, त्यात सेबी अध्यक्ष माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांची भागीदारी असल्याचा आरोप हिंडनबर्ग रिसर्चने केला आहे. ही माहिती समोर आल्यानंतर भारतात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

दरम्यान, हिंडेनबर्गच्या आरोपावर आता स्वत: सेबीच्या अध्यक्ष माधवी बुच यांनीही भाष्य केलं आहे. सेबीच्या अध्यक्ष माधवी बुच आणि त्याचे पती धवल बुच यांनी एक संयुक्त निवेदन जारी करत हिंडेनबर्गच्या आरोपांबाबत प्रतिक्रिया दिली आहे. या निवेदनात त्यांनी हिंडेनबर्ग रिसर्चने केलेले आरोप निराधार असून यात कोणतेही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच आमचे सर्व आर्थिक व्यवहार हे खुला पुस्तकासारखे आहेत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.

हे ही वाचा : महाजन, मुरकुटेंच्या उंबरठ्यावर कानडे !

हिंडेनबर्ग रिसर्चने १० ऑगस्ट रोजी आमच्या संदर्भात जे आरोप केले, ते सर्व निराधार आहेत. त्यांनी केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. आमच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित सर्व कागदपत्रे आम्ही सेबीकडे सादर केली आहेत. याशिवाय सेबीच्या अध्यक्ष होण्यापूर्वीची कागदपत्रेही जाहीर करण्यात आम्हाला कोणताही संकोच नाही, असे त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे. तसेच यापूर्वी सेबीने हिंडेनबर्ग रिसर्चवर कारवाई केली आहे. त्यामुळेच आमच्या चारित्र्यहणन करण्याचा प्रयत्न हिंडेनबर्गकडून केला जातो आहे, असा आरोपही त्यांनी केला.

हिंडेनबर्ग रिसर्चने काय केला आहे आरोप?

हिंडेनबर्ग रिसर्चने म्हटलंय की, अदानी घोटाळ्यात वापरल्या गेलेल्या ऑफशोअर संस्थांमध्ये सेबीच्या अध्यक्षांची हिस्सेदारी होती. एप्रिल २०१७ ते मार्च २०२२ या काळात माधबी पुरी बुच सेबीच्या पूर्णवेळ सदस्याशिवाय त्या अध्यक्षाही होत्या. सिंगापूरमधील Agora Partners नावाच्या कंसल्टिंग फर्ममध्ये त्यांची १०० टक्के भागीदारी होती. १६ मार्च २०२२ रोजी SEBI चेअरपर्सन म्हणून त्यांची नियुक्ती होण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी कंपनीतील त्यांचे शेअर्स पतीच्या नावावर हस्तांतरित केले.

हे ही वाचा : झोळे येथील खून प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना आले यश

त्याशिवाय सेबीच्या अध्यक्षा आणि त्यांचे पती धवल बुच यांच्याकडे त्याच ऑफशोअर बरमूडा आणि मॉरेशिस फंडमध्ये भागीदारी होती हे आम्हाला माहिती नव्हते. जे विनोद अदानी यांच्याद्वारे वापरण्यात आलेल्या कॉम्प्लेक्स नेस्टेड स्ट्रक्चरमध्ये आढळले होते. माधबी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी पहिल्यांदा ५ जून २०१५ रोजी सिंगापूरच्या IPE प्लस फंडमध्ये एकत्र अकाऊंट उघडले होते. IIFL च्या घोषणेत असं म्हटलं होतं की, गुंतवणुकीचा सोर्स हा सॅलरी आणि जोडप्याची एकूण संपत्ती १० मिलियन डॉलर इतकी आहे असंही हिंडेनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे.

हिंडनबर्ग रिसर्च ही यूएस-आधारित कंपनी आहे जिची स्थापना २०१७ मध्ये नॅथन अँडरसन यांनी केली होती. ही एक गुंतवणूक संशोधन संस्था आहे आणि एक कार्यकर्ता शॉर्ट-सेलिंग आहे. हिंडनबर्ग हे नाव १९३७ हिंडनबर्ग आपत्ती या मानवनिर्मित आपत्तीनंतर ठेवण्यात आले. हिंडनबर्ग हे एक हवाई जहाज होते ज्याला हायड्रोजनने इंधन दिले होते. त्यात आग लागली आणि ३५ जणांचा मृत्यू झाला. तर नॅथन अँडरसन ज्याची पार्श्वभूमी फायनान्स आहे आणि हे उदाहरण घेतात आणि म्हणतात की, त्याने ही कंपनी मानवनिर्मित आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी सुरू केली.

हे ही वाचा : मनोज जरांगे यांची रॅली, नगरमधील शाळांना सुटी

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या