Thursday, November 21, 2024
Homeमुख्य बातम्यामतदानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरवातीलाच अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड

मतदानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरवातीलाच अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड

महाराष्ट्रातील ८ लोकसभा मतदारसंघासह, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, केरळ सहित १३ राज्यातील ८८ जागांसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. मतदान करण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर सकाळी ७ वाजेपासूनच लांबच लांब रांगा लावल्या आहेत. मतदान केंद्रावर कुठलाही अनूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. मात्र, मतदानाला सुरुवात होताच काही ठिकाणी ईव्हीएममध्ये मशीनमध्ये बिघाड झाल्याचे पहायला मिळाले आहे.

अमरावती, अकोला वर्ध्या, नागपूर, गोंदियामध्ये ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या. ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रीक बिघाड झाल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अमरावती शहरातील रुक्मिणीनगर येथील शाळा क्रमांक १९ मधील खोली क्रमांक ५ मध्ये ईव्हीएम बंद पडले. जवळपास १५ मिनिटे मतदान यंत्र बंद पडले होेते. त्यामुळे मतदारांचाही खोळंबा झाल्याचे चित्र सकाळी होते. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातही ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला. उमरा गावातील बुथ क्रमांक ३३३ मधील मतदान यंत्र अचानक बंद पडले. त्यामुळे साडेसात वाजेपर्यंत मतदानाला सुरुवात झालेली नव्हती. ईव्हीएम बदलण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते.

- Advertisement -

हिंगोलीत ३९ मतदान केंद्रावर अडथळा
हिंगोलीत ३९ मतदान केंद्रावर पहिल्या दोन तासात मतदानासाठी अडथळा आला आहे. ३९ बॅलेट मशीन आणि १६ कंट्रोल युनिटमध्ये अचानक बिघाड झाला. २५ ठिकाणी ईव्हीएम मशीन बदलाव्या लागल्या आहेत. पहिल्या दोन तासांमध्येच ३९ ईव्हीएम मशीनमध्ये मतदानाला अडथळा आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या या मतदान केंद्रावर सुरळीत सुरू झाले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या