Tuesday, March 25, 2025
Homeनगरमाध्यमिक शिक्षक सोसायटी; 21 जागांसाठी 44 उमेदवार निवडणूक रिंगणात

माध्यमिक शिक्षक सोसायटी; 21 जागांसाठी 44 उमेदवार निवडणूक रिंगणात

सत्ताधारी पुरोगामी विरोधात स्वाभिमानी परिवर्तन मंडळात लढत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीच्या विहीत मुदतीत दोनशेहून अधिक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामुळे माध्यमिकच्या निवडणुकीच्या रिंगणात 21 जागासाठी 44 जणांमध्ये लढत होणार आहे. यंदा सत्ताधारी पुरोगामी मंडळ विरोधात स्वाभिमानी परिवर्तन मंडळात लढत रंगणार आहे. जिल्ह्यातील सुमारे दहा हजार माध्यमिक शिक्षकांच्या राजकारणाची केंद्रबिंदू असणार्‍या अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीसाठी येत्या 23 मार्चला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी दाखल अर्जाच्या माघारीची मुदत मंगळवारी दुपारी संंपली. माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या संचालक मंडळाच्या 21 जागासाठी निवडणूक होत असून माघारीनंतर 44 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

- Advertisement -

जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीसाठी 21 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी दाखल करण्यासाठी मुदत होती. त्यानंतर मंगळवार (दि.11) रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत माघारीसाठी मुदत होती. ही मुदत संपल्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गाच्या 16 जागांसाठी 33 उमेदवार, अनुसूचित मतदारसंघाच्या एका जागेसाठी तिघे, महिलांच्या दोन जागांसाठी चार, ओबीसीच्या एका जागेसाठी दोन आणि भटक्या विमुक्तांच्या एका जागेसाठी दोन असे 44 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. माध्यमिक सोसायटीसाठी 9 हजार 152 मतदार पात्र आहेत. यंदा माध्यामिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीचे वातावरण आतापर्यंत शांत असल्याचे दिसत आहे.

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सत्ताधारी प्रा. भाऊसाहेब कचरे यांच्या विरोधात स्वाभिमानी परिवर्तन मंडळात लढत होत आहे. मागील निवडणुकीत सोसायटीवर कचरे यांच्या पुरोगामी मंडळाने वर्चस्व ठेवले होते. विरोधी गटाचे संचालक निवडून आले होते. मात्र, त्यानंतरही सोसायटीत कचरे यांनी एकहाती कारभार केला होता. यंदा माध्यमिक शिक्षक कोणाच्या हाती सोसायटीच्या चाव्या देणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

हे आहे उमेदवार

सर्वसाधारण मतदारसंघ
धनंजय म्हस्के, विश्वनाथ वेताळ, कल्याण थिटे, आशिष काळदाते, राजेंद्र शिंदे, वाल्मीक काकडे, सचिन फटांगरे, राहुल बोरुडे, भास्कर कानवडे, अशोक काळे, गणेश म्हस्के, संजय चेमटे, बाबासाहेब दाते, सोपान काळे, बाळाजी गायकवाड, छबु फुंदे, विजय पठारे, संभाजी गाडे, उमेश गुंजाळ, बाजीराव अनभुले, किशोर धुमाळ, रावसाहेब रक्टे, सुधीर कानवडे, अतुल कोताडे, केरू आभाळे, अशोक आळेकर, आप्पासाहेब जगताप, आप्पासाहेब शिंदे, राजेंद्र कोतकर, सुनील दानवे, अजितराव दिवटे, महेंद्र हिंगे, शिवाजी लवांडे.

अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ
महेंद्र राजगुरू, विजयकुमार बाणेदार, राजू घाटविसावे.

महिला मतदारसंघ
माधुरी एकशिंगे, वर्षा खिलाडी, सुरेखा ढोकळे, वैशाली दारकुंडे.

ओबीसी मतदारसंघ
संजय वाळे, अर्जुन वाकडे.

भटके विमुक्त मतदारसंघ
वैभव सांगळे, बाबासाहेब बोडके.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...