Sunday, September 29, 2024
Homeदेश विदेशछत्तीसगढच्या दंतेवाडामध्ये जवानांचा 'सर्जिकल स्ट्राईक'; ९ नक्षलवादी ठार

छत्तीसगढच्या दंतेवाडामध्ये जवानांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; ९ नक्षलवादी ठार

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
छत्तीसगडच्या दंतेवाडा आणि बीजापूर या सीमा क्षेत्रात सुरक्षा सुरक्षा बलाचे जवान आणि नक्षलवाद्यांची चकमक सुरु आहे. या चकमकीत जवानांनी आतापर्यंत ९ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. घटनास्थळी नक्षलवाद्यांचे मृतदेहासहित एसएलआर, ३०३ आणि १२ बोरचे हत्यार जप्त करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बस्तर विभागात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या संयुक्त शोध पथकाने मोहीम सुरू केली. मंगळवारी सकाळी १०.३० वाजता शोधा दरम्यान पोलिस दलातील जवानांसमोर पीएलजीए कंपनी नंबर २ च्या नक्षलवादी आले. त्यानंतर दोन्ही बाजूने गोळीबार झाला. या चकमकीत सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांना जोरदार उत्तर दिले आणि ९ नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

मोठ्या शिताफीने जवान नक्षलवाद्यांचा सामना करत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे या अभियानात सुरक्षा दलाचे जवान सुरक्षित आहेत. या सुरक्षा दलाच्या जवानांचं अभियान सुरु आहे. सुरक्षा दलाच्या जवानांकडून आणखी नक्षलवाद्यांना शोध सुरुच असल्याची माहिती मिळत आहे. या धुमश्चक्रीत आणखी नक्षलवाद्यांचा खात्मा होण्याची शक्यता आहे. या चकमकीत अद्याप कोणताही जवान जखमी झाल्याची माहिती नाही. सध्या या परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरु आहे.

दरम्यान, नारायणपुर जिल्ह्यातील अबूझमाड येथे सुरक्षा दलांनी २९ ऑगस्ट रोजी तिघा महिला नक्षलवाद्यांनान ठार केले होते. ठार झालेल्या महिला नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे. या तिघीही उत्तर बस्तर डिव्हिजन कमेटी आणि पीएलजीए कंपनी नंबर ५ च्या सदस्या होत्या. त्यांच्यावर १८ लाख रुपयांचे बक्षिस होते. तेव्हा सुरक्षा दलाला घटनास्थळावरून ३०३ रायफल आणि ३१५ बोर च्या बंदूकांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि नक्षलवादी सामग्री सापडली होती.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या