पांढुर्ली । वार्ताहर Pandurli-sinnar
येथील जनता विद्यालयात (Janata Vidyalaya) हरित सेने (Harit Sene) अंतर्गत नुकताच ‘सीड बँक’ (Seed Bank) उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका व्ही. पी. उकिरडे होत्या. वृक्षारोपण (tree plantation), वृक्ष संवर्धन व संगोपन (Tree conservation and care) या संकल्पना ज्ञात असल्या तरी प्रत्यक्ष वृक्ष निर्मितीसाठी निसर्गातील उपलब्ध बियांचा संग्रह कुणीही करू शकतो.
आपल्याला असलेल्या ज्ञानाची प्रत्यक्ष उपायोजना कृतीत आणणे महत्वाचे असल्याचे उकिरडे म्हणाल्या. हरित सेनेचे प्रमुख एम. आर. रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी (students) विविध फळांच्या बियांचे संकलन (Seed collection) केले. हा उपक्रम वर्षभर राबवला जाणार असून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या परिसरात, घरात सीड बँक अंतर्गत चिंचोके, सीताफळ, चिकू, आवळा, बोर, आंब्यांच्या बियांचे संकलन करण्याचे नियोजन करण्यात आले.
सर्व बियांपासून विद्यालयाच्या परस बागेत रोपे तयार करून 1 जुलै रोजी कृषी दिनाचे औचित्य साधून हरित सेना, स्काऊट गाईडच्या वतीने वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती पर्यवेक्षक डी. एन. टोचे यांनी दिली. यावेळी डी. जी. हगवणे, एस. एस. बोचरे, एस. व्ही. ससाणे, ए. जी. आहिरे, आर. पी. जाधव, जे. के. मळेकर, जे. पी. पवार, एस. वाय. निकवाडे उपस्थित होते.