अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
- Advertisement -
राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत मंजूर झालेल्या मध्यवर्ती परिसर राहुरी येथील म. फुले कृषी विद्यापिठाच्या बियाणे उत्पादनाकरीता उपसा जलसिंचन योजना राबविण्यासाठी 15 कोटी 22 लाख रूपये निधीच्या कार्यक्रमास कृषी विभागाने मान्यता दिली आहे.
राहुरी कृषी विद्यापिठात सन 20117-18 पासून 3 वर्षांच्या कालुवधीसाठी ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली होती. या प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अर्थसहाय्य स्वरूपात 15 कोटी 22 लाख रूपये निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. हा प्रकल्प अद्याप अपूर्ण असून तो 2022-23 पर्यंत राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.