Friday, May 2, 2025
Homeधुळेधुळ्यात दुचाकींसह गुंगीची औषधी जप्त

धुळ्यात दुचाकींसह गुंगीची औषधी जप्त

धुळे ।dhule। प्रतिनिधी

शहरातील मालेगाव रोडवर गुंगीकारक नशा (Narcotic drugs) आणणार्‍या औषधीसाठ्यासह तिघांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून दोन दुचाकींसह (bike) एक लाखांची औषधी जप्त करण्यात आली. चोरटी विक्री करण्यासाठी तिघे बेकायदेशीरपणे हा औषधसाठा घेवून जात होत. याप्रकरणी तिघांवर शहर पोलिसात गुन्हा(crime) दाखल झाला आहे. याबाबत पोलिस अधिक्षक संजय बारकुंड यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली.

- Advertisement -

शाबीर शाह भोलू शाह यांच्यासह तिघे त्यांच्या वाहनाने मालेगाव रोडने धुळे शहरात मानवी शरीर व मेंदुवर परीणाम होईल. अशा गुंगीकारक औषधांच्या बाटल्या चोरीटी विक्री करण्यासाठी घेवून येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ पथकाला कारवाईचे आदेश दिली. पथकाने अन्न औषध निरीक्षक किशोर देशमुख यांच्यासह शहरातील मालेगाव रोडकडून रेल्वे स्टेशनकडे जाणार्‍या खांडल विप्र भवनजवळ रात्री साडेअकरा वाजता सापळा लावून तिघा संशयितांना पकडले.

त्यांच्याकडे मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारे व गुंगीकारक कॉन्डीन्यु सीरप नावाच्या शंभर एमएल मापाच्या 48 हजारांच्या 300 प्लास्टीकच्या बाटल्या, दोन दुचाकी, तीन मोबाईल व रोख दोन हजार 200 रुपये असा एकुण 98 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शाबीर शाह भोलू शाह (वय 42 रा. ऐंशी फुटी रोड, रमजान बाबा नगर, धुळे), कलीम शाह सलीम शाह (वय 34 रा. शिवाजी नगर, ऐंशी फुटी रोड, धुळे) व सद्दाम हुसेन फरीद अन्सारी (वय 31 रा.ताशा गल्ली, ग.नं. 7 सुलतानीया चौक, धुळे) अशी तिघांनी त्यांची नावे सांगितली. त्यांच्याकडे वैद्यकीय क्षेत्राचा कोणताही अधिकृत परवाना किंवा शिक्षण घेतलेले नसतांना तिघे स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन शिवाय गुंगीकारक नशा येणारे औषधीसाठा बेकायदेशीर मार्गाने प्राप्त करून त्यांची चोरटी विक्री करण्यासाठी घेवून जात होते.

याप्रकरणी तिघांवर गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन 1985 चे कलम 8 (क), 22 सह भादंवि कलम 328, 276 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोसई प्रशांत राठोड हे करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक, किशोर काळे व सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश रेड्डी याच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे, शोध पथकाचे पोसई प्रशांत राठोड, पोहेकॉ विजय शिरसाठ, मच्छिद्र पाटील, पोना कुंदन पटाईत, पोकॉ महेश मोरे, मनिष सोनगिरे, प्रविण पाटील, अविनाश कराड, निलेश पोतदार, तुषार मोरे, प्रसाद वाघ, शाकीर शेख, गुणवंतराव पाटील, किरण भदाणे व शाकीर शेख यांच्या पथकाने केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मदरसे

Pahalgam Terror Attack: भारताच्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तान दहशतीत; PoK मधील पर्यटन...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान देशांदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये ( PoK) भारत केव्हाही हल्ला करण्याची...