Thursday, September 10, 2026
Homeनाशिकचोरीच्या दुचाकी हस्तगत

चोरीच्या दुचाकी हस्तगत

नवीन नाशिक | प्रतिनिधी

- Advertisement -

अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने राजे संभाजी स्टेडियमच्या मागे सापळा रचून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून अंबड व गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केलेल्या दोन मोटारसायकल हस्तगत केल्या.

(दि.3 जुलै) मनिष मोहन (46 व्यवसाय-फॅब्रीकेशन दुकान रा. फ्लॅट नं.6, वर्धा हौसिंग सोसा., चाणक्यनगर, कामठवाडा, नाशिक) यांनी त्यांची होंडा कंपनीची पांढर्‍या रंगाची मोटर सायकल (एम.एच.-15-एफ.ई0647 ) हि (दि.30 जून) संध्याकाळी 6 ते7 वाजेच्या सुमारास शिवाजी चौक, भाजीमार्केट, येथुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा तपास करत असतांना अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील अंमलदार प्रविण राठोड यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील चोरी केली मोटारसायकल एक व्यक्ती बुरकुले लॉन्स, राजे संभाजी स्टेडियमच्या मागे विक्री करण्याकरीता येणार आहे. त्यांनी सदरहू माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर,पोलीस शिपाई प्रविण राठोड, सचिन करंजे,तुषार मते, राकेश पाटील, मयुर पवार यांच्या पथकाने सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे विचारणा केली असता तो अल्पवयीन असल्याचे समजले. पोलिसांनी त्याच्याकडून अंबड व गंगापूर पोलीस ठाण्यातून चोरी केलेल्या दोन मोटारसायकल हस्तगत केल्या.

ताज्या बातम्या

default-featured-image

Eknath Shinde : लंडनमध्ये ‘जय महाराष्ट्र’चा गजर! DCM शिंदेंचे फाडफाड इंग्रजीतून...

0
नवी दिल्ली | New Delhi महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ब्रिटनच्या संसदेत आयोजित कार्यक्रमात आपल्या प्रभावी भाषणाने उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या नागरिक-केंद्री, पारदर्शक...