Saturday, November 2, 2024
Homeब्लॉगअशी निवडा कुंडी

अशी निवडा कुंडी

जी झाडे लावायची आहेत त्यांच्या मुळांचा आकार लक्षात घेऊन कुंड्यांची निवड करावी. कुंड्यांच्या मधोमध एक छिद्र असते. त्या छिद्रामधून झाडांच्या मुळांना अनावश्यक असणारे अतिरिक्त पाणी निघून जाते. ते छिद्र नसेल तर त्यामध्ये झाडाची मुळे सडून जातील. आपण केवळ मातीच्याच कुंड्या घ्याव्यात असे नाही. आपल्याला हवे असेल तर घरातील एखादा टब किंवा एखादा मगही पेंट करुन त्याचा वापर कुंडी म्हणून करु शकता.

आपल्याला फक्त इतकेच करायचे आहे की त्याला पेंट करुन त्याच्या मधोमध एखादे छिद्र पाडायचे की झाली कुंडी तयार. कुंडीसाठी कोणते मटेरिअल वापरण्यात आले आहे हे त्या कुंडीतील मातीच्या तापमानावर अवलंबून असते. प्लास्टिकच्या कुंड्या लवकर खराब होऊन जातील. धातूची कुंडी असेल तर तीही लवकर गरम होते. त्यामुळे झाडाच्या रोपट्याच्या मुळांचे नुकसान होते. त्यासाठी सिमेंट, टेरा कोटा, दगड, चांगल्या क्वालिटीचे प्लास्टिक असे पर्याय आहेत.

कुंड्या फार जडही असू नयेत. एखाद्या झाडाला उन्हात ठेवण्याची वेळ आली तर ते सहज उचलता यावे अशा प्रकारच्या कुंड्या निवडाव्यात.

- Advertisement -

जगदीश काळे

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या