नाशिक । Nashik
स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत (Smart Village Scheme) तालुका स्मार्ट ग्राम ग्रामपंचायतींना (Smart Grampanchayat) रविवारी (दि.१५) सकाळी ८.३० वा.पारितोषिक प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालय (Divisional Commissioner Office) येथे पालकमंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांच्या हस्ते हे वितरण करण्यात येणार आहे.
दि.21 नोव्हेंबर 2016 च्या शासन निणर्यानुसार पर्यावरण संतुलीत समृध्द ग्रामयोजनेच्या निकषात व स्वरुपात बदल करून राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीस योजनेत सहभागी होण्याची समान संधी उपलब्ध होईल, अशा पध्दतीने ‘ स्मार्ट ग्राम योजना ‘ या नावाने योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
यासाठी खालीलप्रमाणे ग्रामपंचायती जिल्हा व तालुका स्मार्ट ग्राम ग्रामपंचायत म्हणुन निवड करण्यात आलेली आहे. आहेरगाव ता.निफाड (Niphad Taluka), चणकापुर ता.कळवण (Kalwan Taluka) (जिल्हा स्मार्ट ग्राम (विभागुन).
तालुका स्मार्ट ग्राम निवड झालेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे-दातली (ता.सिन्नर),
टेंभे खालचे (ता.बागलाण), सोग्रस (ता.चांदवड), धामणगाव (ता.इगतपुरी), पाटोदा(ता.येवला), जानोरी(ता.दिंडोरी), ओढा (ता.नाशिक), येसगाव खु.(मालेगांव), रोहिले (ता.त्र्यंबकेश्वर), रामेश्वर (ता.देवळा), मोहपाडा (ता.सुरगाणा), नागापुर(ता.नांदगांव), तोंडवळ(ता.पेठ).