Friday, May 31, 2024
Homeनगरविद्यापिठाच्या कार्यकारी सदस्यपदी सुनील गडाख यांची निवड

विद्यापिठाच्या कार्यकारी सदस्यपदी सुनील गडाख यांची निवड

अहमदनगर (प्रतिनिधी)-

जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंर्वधन समितीचे सभाती सुनील गडाख पाटील यांची महाराष्ट्र पशु व मत्स विज्ञान विदयापीठ नागपूर या विदयापीठाच्या कार्यकारी सदस्य म्हणून निवड झाली आहे.

- Advertisement -

विदयापीठाचे प्रतीकुलपती तथा पशुसंर्वधन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी नाशिक महसूल विभागातून सभापती वर्गवारी मधून विदयापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य सभापती गडाख यांची निवड केलेली आहे. सभापती गडाख हे जिल्हा परिषदेत ज्येष्ठ सदस्य असून त्यांच्या सदस्यपदाच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेत विविध योजना कार्यान्वित झालेल्या आहेत. तसेच पशूसंवर्धन समितीचे सभापती म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे.

त्यांच्या निवडीच जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले, उपाध्यक्ष प्रतापराव शेळके पाटील. सभापती काशिनाथ दाते, उमेश परहर, मिराताई शेटे, सभापती नेवासा पंचायत समिती कांगुणे, सभापती पाथर्डी पंचायत समिती सुनिताताई दौंड, सभापती अकोले उर्मिला राऊत, सर्व अधिकारी जिल्हा परिषद तसेच महाराष्ट्र राज्य पशुवैदयक संघटना यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या