Monday, July 22, 2024
Homeधुळेराष्ट्रसेवा दलातर्फे आत्मक्लेश

राष्ट्रसेवा दलातर्फे आत्मक्लेश

धुळे Dhule । प्रतिनिधी

- Advertisement -

भारतीय संविधान (Indian Constitution) धोक्यात येऊ पाहत आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा (Freedom fighters) इतिहासच पुसून टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. हे मोठे षडयंत्र (Conspiracy) असून त्याविरूध्द आज राष्ट्रसेवा दलातर्फे (Rashtraseva Dal) अहिंसक मार्गाने शहरातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर सामुहिक उपवास करत आत्मक्लेश (Self-torture) आंदोलन करण्यात आले.

महात्मा गांधीजींनी धार्मिक आणि सांप्रदायिक द्वेषाच्या विरूध्द संघर्ष करीत आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या हत्येनंतर काही काळ सांप्रदायिकतेचे काळे आकाश स्वच्छ झाले. परंतु आता ते पुन्हा काळवंडले आहे. नव्या स्वरूपात देशात धार्मिक उन्माद निर्माण केला जात आहे. परिणामी देशातील सर्व धर्म समभावच्या मूल्यांचा अधीक्षेप होत आहे. संविधानातील धर्म निरपेक्ष समाजवाद, धोक्यात येऊ पाहत आहे. समाजात विद्वेशाचे विष पेरले जात आहे. धर्म, पंथ, जात, भाषा व प्रांतवादाचा पुरस्कार करीत विभाजनाच्या तत्वांना खतपाणी घातले जात आहे. एकात्म भारताच्या व लोकशाही राष्ट्रवादावर प्रेम करणार्‍या नागरिकांच्या दृष्टीने ही बाब अत्यंत चिंतेची आणि गंभीर आहे.

तथाकथित धर्म संसदेच्या नावाखाली हिंसक विधाने केली जात आहेत. त्यामुळे भारतीय संविधान धोक्यात येऊ पाहत आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहासच पुसून टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. हे मोठे षडयंत्र असून त्याविरूध्द अहिंसक मार्गाने लढा देणे आवश्यक आहे. त्यासाठी आज राष्ट्रसेवा दलातर्फे शहरातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर दिवसभर बसून सामुहिक उपवास करत आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.

शेवटी सर्व धर्म प्रार्थना म्हणण्यात आली. यावेळी रमेश दाणे, गो.पी.लांडगे, मधुकर शिरसाठ, अनिल देवपूरकर, जसपालसिंग सिसोदिया, रमेश पवार, नितीन माने, विजय महाले, शेख हुसेन गुरुजी, विनोद पगार, कॉ.पोपटराव चौधरी, जगदीश देवपूरकर, कॉ.मधुकर शिरसाट, एल.आर.राव आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या