Friday, November 22, 2024
Homeमुख्य बातम्याज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन

मुंबई | Mumbai

मराठी चित्रपटसृष्टीत सहाय्यक भूमिका निभावणारे ज्येष्ठ कलाकार भालचंद्र कुलकर्णी (Bhalchandra Kulkarni) यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन (Passed Away) झाले आहे…

- Advertisement -

लॉन्ग मार्चमध्ये शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

भालचंद्र कुलकर्णी यांनी ‘झुंज तुझी माझी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’, ‘जावयाची जात’, अशा ३०० पेक्षा चित्रपटांत काम केले होते. तर १९८४ साली आलेल्या ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ या चित्रपटातील ‘चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं’ हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणे खूपच लोकप्रिय झाले होते. याशिवाय अनेक चित्रपटांमध्ये (Movies) त्यांनी विविधांगी भूमिका देखील साकारल्या होत्या.

अवकाळी पावसाचे राज्यात पाच बळी

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून भालचंद्र कुलकर्णी अभिनय क्षेत्रापासून दुर होते. तसेच काही महिन्यांपूर्वी त्यांना ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्काराने (Kolhapur Lifetime Achievement Award) देखील सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार त्यांच्या सिनेकारकिर्दीतील अखेरचा पुरस्कार ठरला होता.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या