Saturday, November 16, 2024
Homeराजकीयभाजपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार सरदार तारासिंह यांचे निधन

भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार सरदार तारासिंह यांचे निधन

मुंबई | Mumbai

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मुंबईतील मुलुंड मतदारसंघातील माजी आमदार सरदार तारासिंह(bjp former mla sardar tarasing) यांचे निधन झाले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या(bjp leader kirit somaiya) यांनी याबाबतची माहिती दिली. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते.

- Advertisement -

सरदार तारासिंह हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांना लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तारासिंह यांच्या निधनाची बातमी ट्विटरवरून दिली आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांच्या निधनाच्या अफवा देखील पसरल्या होत्या. मात्र त्यावेळेसही किरीट सोमय्या यांनी अफवेवर पडदा टाकत त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे स्पष्ट केले होते. त्याचबरोबर मुलूंडचे भाजपा आमदार मिहीर कोटेचा यांनी देखील लीलावती रुग्णालयात जावून तारा सिंह यांच्या कुटुंबाची देखील भेट घेतली होती. तसंच विनोद तावडे यांनी देखील तारा सिंह यांच्या निधनाबद्दल अफवा पसरवून नका, असे आवाहन केले होते.

नगरसेवक ते आमदार असा सरदार तारा सिंह यांचा राजकीय प्रवास होता. सरदार तारा सिंह हे मुंबईतील मुलुंड विधानसभा मतदार संघाचे आमदार होते. 2018 साली त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून नांदेड च्या सचखंड गुरुद्वारा बोर्डच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देखील दिला होता. मागील वर्षी सरदार तारा सिंह यांचा मुलगा रणजित सिंह याला मुंबई पोलिसांनी PMC Bank घोटाळा प्रकरणामध्ये अटक केली होती.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या