जळगाव – Jalgaon
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी अखेर भाजपाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला असून शुक्रवारी दुपारी दोन वाजता शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे राष्ट्रवादीत…
प्रवेश करणार आहेत खडसे यांनी बुधवारी एक वाजेच्या सुमारास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे आज सायंकाळी खडसे आपल्या काही मोजक्या समर्थकांसह मुलगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष एडवोकेट रोहीनी खडसे यांच्यासोबत मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे दरम्यान याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला असून शुक्रवारी दुपारी दोन वाजता मुंबईच्या फोर्ट परिसरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
खडसेंच्या पदाबाबत नंतर निर्णय
जयंत पाटील म्हणाले, खडसे यांना काय पद देण्यात येईल वगैरे आता काही सांगता येणार नाही. त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होतोय हीच आनंदाची बाब आहे. भाजपात त्यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे त्यांनी भाजपा सोडला असून, त्यामुळेच त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात येत आहे,” असे पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादीतून गेलेलेही परत येतील : माजीमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे शुक्रवार दि.२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंती पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, भाजपमध्ये खडसेंवर अन्यायच होत गेला, आता त्यांच्यासोबत कोण प्रवेश करेल अजून सांगता येत नसले तरी राष्ट्रवादीतून गेलेलेही परत येतील असे ते म्हणाले.
– जयंत पाटील