Monday, November 18, 2024
HomeUncategorized‘सिनियर सिटीझन’ची बाईक रॅली 

‘सिनियर सिटीझन’ची बाईक रॅली 

१३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘सिनियर सिटीझन’ चित्रपटाच्या निमित्ताने ८ डिसेंबरला एका बाईक रैलीचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे येथील गडकरी रंगयातन इथून सुरु झालेली ही बाईक रैली राम मारुती रोड,  नौपाडा, हरी निवास सर्कल, प्रशांत कॉर्नर,  टी.एम.सी. सर्कल, चराई सिग्नल, गजानन महाराज चौक, दगडी शाळा मार्गे निघाली होती.

या बाईक रैलीचा समारोप गडकरी रंगयातन इथे झाला. या रैलीला हिरवा झेंडा जेष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी दिला. या रैलीच्या निमित्ताने ‘हेल्मेट घाला अपघात टाळा’ हा सामाजिक संदेशही देण्यात आला. या बाईक रैली मध्ये ठाण्यातील रिबेल रायडर्स, हायवे हंटर आणि कल्याणच्या गियर फाय या बाईकर्स ग्रुपच्या  ५० पेक्षा जास्त बाईकर्सने सहभाग घेतला होता.

- Advertisement -

या बाईक रैलीमध्ये बाईकर्सचा उत्साह वाढवण्यासाठी ‘सिनियर सिटीझन’ चित्रपटातील सुयोग्य गोऱ्हे,  किरण तांबे, केतन कारंडे आदी कलाकार उपस्थित होते. पहिल्यांदाच या तिन्ही ग्रुपच्या बाईकर्सने चित्रपटाच्या प्रमोशन साठी बाईक रैली केल्याने त्यांचा  उत्साह द्विगुणित झाला होता.

मोहन जोशींना वैयक्तिक आयुष्यात बाईक चालवायला प्रचंड आवडते. बाईक चालवणे ही त्यांची पॅशन आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या चित्रपटातही मोहन जोशी यांनी बाईक चालवली आहे.

पिढ्यानपिढ्या देशसेवेचे व्रत आचरणात आणणाऱ्या अभय देशपांडें आणि त्यांची पत्नी लक्ष्मी देशपांडे या जोडप्याच्या अवती भोवती चित्रपटाचे कथानक गुंफले गेले आहे. निवृत्त लष्कर अधिकारी अभय देशपांडे आपल्या पत्नीसोबत निवृत्तीनंतरचे निवांत आयुष्य जगत असतानाच समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींविरोधात ते पुढे येऊन आवाज उठवतात आणि चुकीच्या गोष्टींना विरोध करतात.

एक अघटित घटना घडून या देशपांडे दाम्पत्यांच्या आयुष्यात वादळ निर्माण करते. तर दुसरीकडे आजची तरुण पिढी स्वच्छंदी आयुष्य जगण्याच्या नादात सर्व भान विसरून आपल्या चैनीच्या गरज पूर्ण करण्यासाठी कोणत्या थरापर्यंत जाऊ शकते याचे वास्तववादी चित्रण या सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

‘सिनियर सिटीझन’ चित्रपटाचे दिग्दर्शन अजय फणसेकर यांनी केले असून  माधुरी नागानंद आणि विजयकुमार नारंग यांनी या सिनेमाची निर्मित केली आहे.

या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, स्मिता जयकर, सुयोग गोऱ्हे, अमृता पवार, स्नेहा चव्हाण, श्रुती बोराडीया, किरण तांबे, विजय पाटकर, शीतल क्षीरसागर, अमोल जाधव, गौरीश शिपूरकर, हर्षल पवार हे  कलाकार महत्वपूर्ण भूमिका निभावताना दिसणार आहेत.

‘सिनियर सिटीझन’ या चित्रपटात क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून राजू सावला यांनी काम पहिले आहे. तर प्रमोद सुरेश मोहिते चित्रपटाचे एक्झिक्टिव्ह प्रोड्युसर आहेत. हा सिनेमा येत्या १३ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या