Monday, July 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदुचाकी व कार अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

दुचाकी व कार अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

पंचाळे | वार्ताहर Panchale

- Advertisement -

पंचाळे पांगरी रस्त्यालगत मीठसागरे देवपूर चौफुली येथे दुपारी तीन वाजता मोटरसायकल व क्रेटा कार यांच्यात झालेल्या अपघातात पंचाळे येथील सर्जेराव निवृत्ती थोरात (वय 70) यांचा मृत्यू झाला.

थोरात देवपूर रस्त्याने मोटरसायकलवर जात असताना सिमेंट रस्ता ओलांडताना पांगरीकडून येणाऱ्या (MH 15 JH 5658) क्रमांकाच्या क्रेटा कारने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर कार नालीत जाऊन विद्युत खांबावर आदळली. एअरबॅग उघडल्यामुळे कारमधील प्रवासी बचावले.

धडकेनंतर जखमी थोरात यांना रुग्नावाहीकेने सिन्नरला नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. वावी पोलीसांनी घटनास्थळी पाहणी केली. शवविच्छेदनानंतर रात्री पंचाळे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : कारवाईचा संताप, मर्सडीजचा भुगा! बडतर्फ केल्याच्या रागातून...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik होमिओपॅथी मेडिसिनच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यास (Student) शिस्तभंगाच्या कारवाईतून वैद्यकीय महाविद्यालयाने बडतर्फ केले असतानाच, हा राग मनात धरून त्याने...