Sunday, November 17, 2024
Homeनंदुरबार45 हजाराची लाच घेताना वरिष्ठ लिपिकाला अटक

45 हजाराची लाच घेताना वरिष्ठ लिपिकाला अटक

नवापूर । श. प्र. Navapur

स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर मिळणार्‍या रजा रोखीकरणाची रक्कम काढून दिल्याच्या मोबदल्यात 45 हजाराची लाच स्वीकारणार्‍या नवापूर येथील एका शाळेच्या वरिष्ठ लिपिकला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. याबाबत नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

यातील तक्रारदार यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्या रजा रोखिकरणाची रक्कमदी.एन.डी.अँड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल नवापूर येथील वरिष्ठ लिपिक विनोद साकरलाल पंचोली याने दिलेल्या धनादेशाद्वारे तक्रारदारांच्या बँक खात्यात जमा झाली होती. सदर रजा रोखीकरणाची रक्कम काढून दिल्याच्या मोबदल्यात विनोद पंचोली याने तक्रारदाराकडून 45 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून काल दि. 21 जून 2023 रोजी पंच, साक्षीदार यांच्या समक्ष स्वीकारली. याबाबत नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक राकेश आ. चौधरी, पोलीस निरीक्षक समाधान वाघ, पोहवा विलास पाटील, ज्योती पाटील, विजय ठाकरे, पोना देवराम गावित, अमोल मराठे, पोना संदीप नावडेकर, चापोना जितेंद्र महाले यांच्या पथकाने केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या