Friday, March 28, 2025
Homeनाशिकज्येष्ठ साहित्यिक डॉ. शंकर बोऱ्हाडे यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शंकर बोऱ्हाडे यांचे निधन

नाशिक | Nashik

येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शंकर बोऱ्हाडे (Dr. Shankar Borhade) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन (Passed Away) झाले आहे. डॉ. बोऱ्हाडे यांच्यावर नाशिकमधील (Nashik) गुरुजी रुग्णालयात उपचार सुरु होते. यावेळी उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे नाशिकच्या साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे…

- Advertisement -

डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी देशदूतमध्ये अनेक वर्ष विविध विषयांवर लेखन केले. त्यामुळे त्यांचे देशदूतशी घनिष्ट संबध होते. तसेच बोऱ्हाडे हे गेली ४० वर्षे साहित्य क्षेत्रात (literature) सक्रिय होते. त्यांचे मरणगाथा (कवितासंग्रह), कडा आणि कंगोरे (व्यक्तिचित्र संग्रह) उजेडा आधीचा काळोख (ललित) देशभक्त शेषराव घाटगे (चरित्र) विडीची गोष्ट (उद्योगाचे चरित्र) शोध डॉ वसंतराव पवारांचा, लोकपरंपरेचे सिन्नर (Sinner) ही संपादित पुस्तके प्रसिद्ध असून त्यांनी सार्वजनिक वाचनालयात विश्वस्त म्हणून काम केले होते.

जायकवाडीसाठी गंगापूरमधून विसर्ग सुरु

तसेच ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजनात त्यांचा सहभाग होता. मराठीचे प्राध्यापक असणारे डॉ.बोऱ्हाडे यांनी साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात आपले योगदान दिले. तर गेल्यावर्षी नाशिकमध्ये संपन्न झालेल्या पहिल्या अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अनेक नव्या साहित्यिकांना घडविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

दरम्यान, डॉ. बोऱ्हाडे यांच्यावर सोमवार (दि.२७ नोव्हेंबर) रोजी सकाळी साडेदहा वाजता जेलरोड दसक येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik News : नाशकात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वाढत्या वयानुसार निरोगी राहणासाठी काय करावे ?

0
वाढत्या वयाबरोबर अनेक समस्या येतात. योगासनामुळे या समस्या दूर होऊ शकतात. माणसाचे वय जसजसे वाढत जाते तसतसे त्याच्या शरीरात वेगवेगळे बदल येऊ लागतात ....