Wednesday, December 4, 2024
Homeदेश विदेशडीटीएचवर प्रत्येक इयत्तेसाठी वेगळा चॅनेल

डीटीएचवर प्रत्येक इयत्तेसाठी वेगळा चॅनेल

सार्वमत

नवी दिल्ली – शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन एज्यूकेशनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार आहे, डीटीएचवर प्रत्येक इयत्तेसाठी वेगळा चॅनेल तयार करण्यात येणार आहे. सध्या असे तीन चॅनल असून यामध्ये आणखी 12 चॅनलची भर पडणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे इंटरनेटच्या सुविधेचा अभाव असेल त्यांच्यासाठी हे फायद्याचं असेल असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत अभियान पॅकेजच्या संदर्भात रविवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सलग पाचव्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. या आधीच्या चार पत्रकार परिषदांमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक, स्थलांतरित मजूर, वीज कंपन्या, स्थावर मालमत्ता, वित्त संस्था, कृषी, कोळसा, खनिज आणि संरक्षण क्षेत्रासंदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

रविवारी त्यांनी शिक्षणक्षेत्रासाठी ही महत्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितलं की, स्वयंप्रभा डीटीएच चॅनलमध्ये पहिल्यांदा 3 चॅनल होते. यात आता 12 नवीन चॅनल जोडले जाणार आहेत. लाईव्ह इंटरअ‍ॅक्टिव्ह चॅनलसाठी काम देखील केलं जात आहे. राज्य सरकारांनी यासाठी चार तासांचं कंटेंट दिलं जावं, जे लाईव्ह चॅनलवर दाखवलं जाऊ शकेल, असं त्या म्हणाल्या.

देशातील 100 विद्यापीठांमध्ये 30 मेपर्यंत ऑनलाईन कोर्स सुरु केले जातील, असंही त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन वर्गासाठी नवे 12 चॅनल्स सुरु केले आहेत. ई-पाठशाला अंतर्गत 200 नवी पुस्तकांचा समावेश केला आहे, असं देखील त्यांनी सांगितलं. खाजगी डीटीएच ऑपरेटर्सचीही ऑनलाईन वर्गासाठी मदत घेतली जाईल, असं त्या म्हणाल्या.

‘वन क्लास, वन चॅनल’ – चॅनलद्वारे ई-कॉन्टेंटची निर्मितीही होईल. वन क्लास, वन चॅनल या योजनेद्वारे 12 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी चॅनेल तयार केले जातील. पॉडकॉस्ट, कम्युनिटी रेडिओ या माध्यमाचा वापर करण्यात येणार आहे. विद्यार्थी, पालकांच्या मानसिक आरोग्यासाठी मनोबल प्रोग्रामही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच दिव्यांगासाठी विशेष शिक्षा सामग्री तयार करण्यात येईल. देशातील टॉप 100 विद्यापीठांना ऑनलाईन शिक्षणाची परवानगी देण्यात आली आहे, असंही त्या म्हणाल्या.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या