Thursday, June 20, 2024
Homeनाशिक१४ सप्टेंबरचा लोकशाही दिन रद्द

१४ सप्टेंबरचा लोकशाही दिन रद्द

नाशिक । Nashik

- Advertisement -

प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे करण्यात येते.

परंतु करोना विषाणुच्या संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदीचा कालावधी ३० सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे १४ सप्टेंबरला होणारा विभागीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला असल्याचे, विभागीय महसूल उपायुक्त दिलीप स्वामी यांनी कळविले आहे.

विभागातील नाशिक, जळगांव, अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार येथील नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या