Monday, November 18, 2024
Homeराजकीयमहिला खासदाराचे केंद्रीय अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

महिला खासदाराचे केंद्रीय अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

दिल्ली | Delhi

द्रमुकच्या खासदार कनिमोझी करुणानिधी यांनी एका केंद्रीय अधिकार्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यांनी केंद्रीय आयुष मंत्रालयाचे मंत्री श्रीपाद नाईक यांना पत्र लिहित आयुषचे सचिव राजेश कोटेचा यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

खासदार कनिमोझी करुणानिधी यांनी केंद्रीय आयुष मंत्रालयाचे मंत्री श्रीपाद नाईक यांना पत्र लिहित म्हंटले आहे की “वेबिनारमध्ये हिंदी न येणाऱ्या डॉक्टरांना प्रशिक्षण सत्र सोडून जाण्यास सांगितलं. सरकारने सचिवांना निलंबित करावे आणि योग्य अनुशासनाद्वारे कार्यवाही करावी. हिंदी न येणाऱ्या व्यक्तींना बाहेर काढण्याची ही पद्धत कधीपर्यंत चालणार?” असा सवाल देखील त्यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात लक्ष घालून योग्य ती चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. काही दिवसांपूर्वी द्रमुकच्या खासदार कनिमोझी करुणानिधी यांच्यासोबत घडलेल्या प्रसंगावरून हिंदी भाषेबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या