Saturday, May 4, 2024
Homeनाशिकसमृद्धीच्या दूतर्फा होणार सर्व्हिस रोड

समृद्धीच्या दूतर्फा होणार सर्व्हिस रोड

घोटी । Ghoti

इगतपुरी तालुक्यातून समृद्धी महामार्गाचे काम सुरू गेल्या काही दिवसांपूर्वी खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत मुंबई नागपुर समृध्दी महामार्गाचे कामबंद आंदोलन करण्यात आले होते.

- Advertisement -

दरम्यान समृद्धीच्या दोन्ही बाजूनी सर्व्हिस रोड व्हावा अशी अशी मागणी पंचायत समिती चे सदस्य विठ्ठलं लंगडे यांनी केली होती. आज अखेर प्रशासनाने त्यांच्या मागणीचा विचार करत इगतपुरी तालुक्याला हिरवाकंदील दिला आहे.

यावेळी परिसरातील स्थानिक शेतकरी व नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच काही मागणीबाबत काम बंद आंदोलन करण्यात आले होते. खासदारांच्या माध्यमातून व तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत समृद्धी महामार्गाचे काम करत असलेल्या जीव्हीपीआर कंपनीकडे विशेष लेखी स्वरूपात मागण्या केल्या होत्या की चुकीचे अंडरपास मोरीचे बांधकाम तसेच देवळे ते नांदगाव सदो दोन्ही बाजुचे सर्विस रोड व खराब झालेले स्थानिक रस्ते बनवून देण्यात यावेत.

याबाबत जो पर्यंत जीव्हीपीआर कंपनी लेखी स्वरूपात उत्तर देत नाही तोपर्यंत काम बंद करण्यात येईल. परंतु आज संबंधित कंपनीकडून सकारात्मक लेखी उत्तर देण्यात आलेलें असून काही आपण केलेले प्रश्न महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे जीव्हीपीआर कंपनीने प्रस्तावित केले असून तसेच काही मागण्या लेखी स्वरूपात लेखी पत्रात उत्तर देण्यात आलेलं आहे.

भविष्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे जीव्हीपीआर कंपनी कडून पाठविण्यात आलेल्या प्रास्ताविक मागण्यांचे योग्य उत्तर न याल्यास यापेक्षा ही मोठं काम बंद आंदोलन छेडण्यात येईल.

मात्र आज कपनी व्यवस्थापना कडून व जीव्हीपीआर कंपनीकडून मिळालेल्या सकारात्मक लेखी पत्रानुसार तात्पुरत्या स्वरुपात काम बंद आंदोलन मागे घेण्यात येत आहे आज कँपनीने सकारत्मक बाजू दाखविल्यामुळे विठ्ठल लंगडे, ज्ञानेश्वर लहाने व भगवान आडोळे यांच्या मागणीला यश आले आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या