Tuesday, March 25, 2025
HomeराजकीयAAP : दिल्लीत 'आप'ला मोठं खिंडार! गंभीर आरोप करत बड्या नेत्याने मंत्रिपद...

AAP : दिल्लीत ‘आप’ला मोठं खिंडार! गंभीर आरोप करत बड्या नेत्याने मंत्रिपद सोडलं, पक्षाचा राजीनामाही दिला

दिल्ली। Delhi

दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दिल्ली सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते यांनी रविवारी परिवहन मंत्रिपदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

- Advertisement -

पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राजीनाम्याचे पत्र पाठविले असून त्यात पक्षाने आपली आश्वासने पाळली नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पक्ष आता सामान्य जनतेचा उरला नाही, अशी खंत व्यक्त केली आहे. दरम्यान, गहलोत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

कैलाश गेहलोत यांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री आतिशी यांनी म्हटलं की, ‘भाजपचे हे घाणेरडे षडयंत्र आहे. ईडी आणि सीबीआयच्या जोरावर भाजपला दिल्लीतील विधानसभा निवडणूक जिंकायची आहे’.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...