Tuesday, July 16, 2024
Homeमुख्य बातम्याRoad Accident : भीषण अपघातात ७ इंजिनियर विद्यार्थ्यांचा मृत्यू, अनेक जखमी

Road Accident : भीषण अपघातात ७ इंजिनियर विद्यार्थ्यांचा मृत्यू, अनेक जखमी

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

- Advertisement -

आसाममधील (Assam) गुवाहाटीमध्ये (Guwahati) जलुकबारी भागात झालेल्या एका रस्ते अपघातात सात विद्यार्थ्यांचा (Students) दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामुळे हळहळ व्यक्त होत असून अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे समजते…

धनंजय मुंडेंकडे नाशिकची जबाबदारी? भुजबळ स्पष्टच बोलले…

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महिंद्रा स्कॉर्पिओने बॉयलर कोंबड्या घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअप व्हॅनला धडक दिल्याने हा अपघात घडला. यावेळी स्कॉर्पिओमधून जात असलेल्या विद्यार्थ्यांचा भीषण अपघात (Accident) झाल्याने त्यात सात जणांचा मृत्यू झाला. आधी ही कार दुभाजकाला धडकली आणि नंतर दुसऱ्या गाडीला धडक दिली. या गाडीचा वेग खूप जास्त असल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी (Police) घटनास्थळी दाखल होत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर मयत विद्यार्थ्यांचे मृतदेह ताब्यात घेतले असून रुग्णालयात शवविच्छेदन अहवालासाठी पाठविण्यात आले आहे.

Road Accident : भीषण अपघातात ७ इंजिनियर विद्यार्थ्यांचा मृत्यू, अनेक जखमी

अपघातात मृत व जखमी झालेल्यांची नावे

निओर डेका, उपांशु शर्मा, कौशिक बरुआ, कौशिक मोहन, राज किरण भुइयां, एमोन बरुआ, अरिंदम भौवाल अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. तर मृण्मय बोरा, अर्नव चक्रवर्ती आणि अर्पण भुइयां घायल अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे असून उर्वरित जखमी विद्यार्थ्यांची नावे अद्याप समजू शकलेले नाही.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

- Advertisment -

ताज्या बातम्या