Tuesday, April 29, 2025
Homeनंदुरबारजलोला येथे सात लाखांचा मद्यसाठा जप्त

जलोला येथे सात लाखांचा मद्यसाठा जप्त

नंदुरबार – 

धडगाव तालुक्यातील जलोला शिवारात आज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अवैधरित्या वाहतूक करणार्‍या वाहनाला पकडून सुमारे सात लाखांचा मद्यसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, धडगांव-चिचखेडी  रस्तामार्गे जलोला शिवारातून अवैधरित्या विदेशी मद्य व बिअरची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक युवराज राठोड यांना मिळाली. त्यांनी खेडदिगर सिमा तपासणी नाक्याच्या पथकाला सोबत घेवून जलोला शिवारात सापळा रचला. यावेळी  पिकअप गाडी (क्र.एम.एच.39- सी. 7736) आली असता तिला अडवून तपासणी केल्यावर अवैद्य मद्यसाठा आढळून आला. त्यात बॉम्बे स्पेशल व्हिस्की व पॉवर दहा हजार स्ट्राँग बिअरचे असे एकूण 179 खोके असलेला 7 लाख 28 हजार 600 रूपये किंमतीचा अवैध विदेशी मद्यसाठा मिळून आला. यावेळी पथकाने पिकअप वाहनासह एक दुचाकी (क्र.एम.एच.14- एफ.बी. 1375), सॅमसंग कंपनीचे दोन मोबाईल व मद्यसाठयासह असा एकूण

11 लाख 78 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी केशव खाज्या पाडवी, संजय धर्मा पाडवी दोघे रा. खांडबारा, खुंडामोडी ता.धडगंव या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत जवान तुषार सोनवणे यांच्या फिर्यादीवरून दोन्ही संशयीतांविरूध्द 1994 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक युवराज राठोड, खेडदिगर सिमा तपासणी नाक्याचे दुय्यम निरीक्षक ए.पी.शिंदे, बी.एस.चौधरी, भूषण चौधरी, मानसिंग पाडवी, राजेंद्र पावरा, मोहन पवार, रामसिंग राजपूत, तुषार सोनवणे यांच्या पथकाने केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Congress News : संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा, काँग्रेसचे पंतप्रधान मोदींना पत्र

0
दिल्ली । Delhi जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना...