नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मार्केट यार्डातील हमालीसह वर्चस्वाच्या वादातून नातलगावरच हल्ला (Attack) करून त्याचा खून (Murder) केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने (District Court) दोन कुटुंबातील सात आरोपींना दोषी धरुन जन्मठेप व ३५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. आरोपींमध्ये पाच सख्खे भाऊ (Brothers) व एका महिलेचा (Woman) समावेश आहे. १३ जून २०१८ रोजी फुलेनगर येथील लक्ष्मणनगर परिसरात आरोपींनी सुनिल सुखलाल गुंजाळ (२१, रा. पेठरोड) याचा खून केला होता.
हे देखील वाचा : Nashik Fraud News : लग्नाचे आमिष दाखवून १२ लाखांची फसवणूक
जयराम नामदेव गायकवाड, दशरथ नामदेव गायकवाड, श्रीराम नामदेव गायकवाड, सुरज जयराम गायकवाड (चौघे रा. तेलंगवाडी, पेठरोड), अंबिका अर्जुन पवार (वैशाली नगर, पेठरोड), संदिप चंद्रकांत पवार व राहुल चंद्रकांत पवार (दोघे रा. अश्वमेध नगर, पेठरोड) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील गुंजाळ व आरोपी एकमेकांचे नातलग होते. ते मार्केट यार्डात हमालीचे काम करीत होते. त्यांच्यात वाद झाल्याने पंचवटी पोलिस ठाण्यात (Panchvati Police Station) परस्पर विरोधी तक्रार दाखल होती.
हे देखील वाचा : Nashik News : जिल्ह्यात ५० लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क
त्यानंतर १३ जूनला सकाळी नऊ वाजता आरोपींनी (Suspeted) सुनील गुंजाळ याच्यासह सागर माने व दीपक गोराडे यांच्यावर हल्ला केला. त्यात सुनीलचा जागीच मृत्यू (Death) झाला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांनी तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे अॅड. एस. एस. गोरवाडकर, डॉ. सुधीर कोतवाल यांनी युक्तीवाद केला.
हे देखील वाचा : Mahayuti Press Conference : महायुतीचे ‘रिपोर्ट कार्ड’ प्रकाशित; कुठे केली गुंतवणूक, कोणती कामे केली?
त्यानुसार गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. एम. दळवी यांनी सातही आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा (Punishment) सुनावली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार मधुकर पिंगळे, एस. टी. बहिरम यांनी कामकाज पाहिले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा