Saturday, July 27, 2024
Homeदेश विदेशNCP Crisis : शरद पवारांना पुन्हा धक्का; राष्ट्रवादीच्या आणखी सात आमदारांचा अजित...

NCP Crisis : शरद पवारांना पुन्हा धक्का; राष्ट्रवादीच्या आणखी सात आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा

मुंबई | Mumbai

अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीत (NCP) मोठी फुट पडली असून राज्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी (MLA) मंत्रिपदाची शपथ घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

Rain Update : राज्यात पुढील ५ दिवस कोसळणार धो-धो पाऊस; हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’

यानंतर अजित पवारांनी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक आमदार असल्याचे म्हणत निवडणूक आयोगात (Election Commission) आपणच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा केला. तसेच पक्षातील सदस्यांनी आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून नेमणूक केल्याचे निवडणूक आयोगाला सांगितले. त्यानंतर आता महाराष्ट्रात (Maharashtra) झालेल्या राजकीय भूकंपानंतर नागालँडमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्क बसला आहे.

Irshalwadi Landslide : मुख्यमंत्री शिंदे सकाळपासून इर्शाळवाडीत तळ ठोकून; दुर्घटनेबाबत दिली मोठी माहिती

याबाबत अधिक माहिती अशी की, नागालँडमधील (Nagaland) राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात आमदारांनी शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडत अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. याबाबत त्यांनी एक पत्र जारी केले असून त्यात म्हटले आहे की, प्रदेश कार्यकारणी आणि जिल्हाध्यक्षांशी चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात नागालँडमध्ये पक्षाला मजबूत करण्याचा निश्चय केला आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Nashik : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार संरक्षण भिंतीवर आदळली, दोघांचा मृत्यू

तसेच नागालँडमधील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष वान्युंग ओडिओ यांनी दिल्लीत जावून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांची भेट घेतल्याची माहिती अजित पवार गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रजमोहन श्रीवास्तव यांनी दिली. यावेळी वान्युंग ओडिओ यांनी सात आमदारांसह पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र त्यांना सुपुर्द केली.

घृणास्पद! मणिपूरमध्ये दोन महिलांना निर्वस्त्र करत फिरवले रस्त्यावर; व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, नागालँडमध्ये वर्षाच्या सुरूवातीला झालेल्या निवडणुकांमध्ये एनडीपीपी-भाजप युतीला (NDPP-BJP Alliance) ३७ जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यात एनडीपीपीला २५ आणि भाजपला १२ जागांवर विजय मिळाला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसला सात जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एनडीपीपी आणि भाजपला स्पष्ट बहुमत असतानाही त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Irshalwadi Landslide : “अन् आई-बाबांना पळताही आले नाही…”; दुर्घटनेतून बचावलेल्या तरुणाने सांगितला अंगाचा थरकाप उडवणारा घटनाक्रम

- Advertisment -

ताज्या बातम्या