नाशिक | प्रतिनिधी | Nashik
दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) डर्बन येथे रविवार (दि. ११ जून) रोजी झालेल्या ८९ किलोमीटरच्या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये (Comrade Marathon Competition) नाशिकच्या सात धावपटूंनी ही स्पर्धा वेळे अगोदर पूर्ण करून झेंडा रोवला आहे. या स्पर्धेत भारतातील ९० टक्के स्पर्धकांनी (Competitors) ती पूर्ण केली आहे…
ही मॅरेथॉन जगातील सर्वात कठीण स्पर्धा समजली जाते. यावर्षी जून महिन्याच्या दुसर्या आठवड्यात या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. जगातील अगदी मोजके धावपटु या कॉम्रेड स्पर्धेसाठी क्वालिफाय होतात. डर्बन ते सेंट पिटरबर्ग (Durban to Sent Petersburg) या शहरा दरम्यानच्या ९० किमी अंतरासाठी ही स्पर्धा ११ तास ४५ मिनिटात पूर्ण करणे गरजेचे असते.
त्यानुसार नाशिकच्या डॉ. धनंजय डुबेरकर यांनी हे अंतर ९ तास १८ मिनिटात, किरण गायकवाड यांनी ९ तास ३१ मिनिटात, महेंद्र छोरीया यांनी ९ तास ५२ मिनिटात, संदीप हंडा यांनी १० तास २६ मिनिटात, प्रशांत डबरी यांनी ११ तास २९ मिनिटात, सागर पाटील यांनी ११ तास ३० मिनिटात तर डॉ. पंकज भदाणे यांनी ११ तास ३२ मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली.
दरम्यान, या स्पर्धेत यावर्षी संपूर्ण भारतातील ४०३ धावपटू (Runner) सहभागी झाले होते. त्यातील ३५ धावपटू हे पुण्यातील होते. तर नाशिकचे सात धावपटू सहभागी झाले होते. या सातही धावपटूंनी गेल्या अनेक महिन्यांच्या परिश्रमानंतर ही स्पर्धा पूर्ण केली आहे. तसेच या सर्व धावपटूंनी एक वर्षापासून तयारी केली होती.
त्यामध्ये पहाटे उठून शारिरीक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ कसे सुदृढ राहील याकडे लक्ष केंद्रीत केले होते. रोजच्या सरावाबरोबर अप हिल व डाऊन हिल असे प्रकार ते करीत होते. दररोज ठराविक अंतर तर रविवारी लॉँग रनचा सराव त्यांनी केला होता.या स्पर्धेच्या पात्रतेसाठी तीन सराव वर्ग करणे बंधनकारक असते यातील दोन सराव वर्ग भारतातील लोणावळा व एक सराव वर्ग लवासा येथे आयोजित करण्यात आला होता. ज्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले अशाच व्यक्तींना या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...
आपल्याला ही स्पर्धा पूर्ण करायची असे प्रत्येक रनरचे स्वप्न असते. ही मॅरेथॉन धावत असताना रस्त्याच्या दुतर्फा जे लोक प्रोत्साहन करायला उभे होते दक्षिण अफ्रिकेत आपल्या भारता बद्दल आदर दिसून आला. त्या ठिकाणी भारतासाठीच्या घोषणा दिल्यामुळे धावपटूना एक वेगळीच ऊर्जा मिळत होती.पहिल्यांदाच नाशिकमधील सात स्पर्धक यात सहभागी झाले होते. अत्यंत कठोर श्रमानंतर ही स्पर्धा पूर्ण सर्वांनी पूर्ण केली. जास्ती जास्त स्पर्धकांनी यास्पर्धेत सहभागी व्हावे.
महेंद्र छोरीया, धावपटू