Monday, May 27, 2024
HomeUncategorizedसात वर्षांपूर्वी जिथे आईचा प्राण गेला तिथेच मुलगा झाला ठार!

सात वर्षांपूर्वी जिथे आईचा प्राण गेला तिथेच मुलगा झाला ठार!

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

घरातून चुपचारपणे कार घेऊन घराबाहेर पडलेल्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा भरधाव कार स्कायवॉकला धडकून झालेल्या अपघातात करून अंत झाला. या अपघातात (accident) कारचा चुराडा झाला असून हा अपघात शुक्रवारी मध्यरात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास जालना रोडवरील एसएफएस शाळेसमोर असलेल्या स्कायवॉकजवळ घडला. 

- Advertisement -

भरदिवसा व्यापाऱ्याला लुटणारे जेरबंद

सोहम निरज नवले (वय १७, रा. इस्सार पेट्रोल पंपजवळ,गजानन मंदिर परिसर) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मयत सोहम नवले हा शहरातील वंडर गार्डन शाळेत दहावीत शिक्षण घेत होता. त्यांनी मुलीकडे चौकशी केली असता तिला काही माहिती नसल्याने दोघेही दुचाकीवर सोहमचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडले. परंतु, इकडे सोहम हा भरधाव कार चालवीत असताना पावणे दोन वाजेच्या सुमारास एसएफएस शाळेसमोरील दुभाजकाला धडकला. हा अपघात इतका भीषण होता की पोलमुळे कार चिरल्या गेली. नागरिकांनी पोलिसाना फोन करून माहिती दिली. पोलिसानी घटनास्थळी धाव घेऊन सोहमला घाटीत दाखल करून वाहतूक सुरळीत केली. मात्र उपचार सुरू असताना पहाटे तीन वाजता त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. 

विशेष म्हणजे गुरुवारी त्याने पहिलाच पेपर दिला होता. रात्री तो वडील व बहिणीसोबत कॅनॉट परिसरात आईस्क्रीम खाण्यासाठी गेला होता. ते रात्री अकरा वाजता घरी परत आल्यावर सर्वजण झोपी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारसा सोहम याने वडीलांची कार क्रमांक (एमएच- २०-वाय-६८१९) घेवून घराबाहेर पडला. रात्रीच्या वेळी सोहमचे वडील निरज नवले यांना जाग आल्यावर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी सोहमच्या खोलीत जावून बघितले असता तो खोलीत नसल्याचे तसेच घरासमोरील कार नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 

आईचाही तिथेच गेला होता प्राण 

सोहमच्या आईचा देखील त्याच ठिकाणी मृत्यू मयत सोहमच्या ज्याठिकाणी अपघात झाला आहे, त्याच ठिकाणी सात वर्षांपूर्वी त्याची आई वर्षा नवले या रस्ता ओलंडत असताना त्यांना भरधाव दुचाकीस्वाराने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. 

शहरातील कर्तृत्ववान महिलांची ओळख ‘अव्याना’!

- Advertisment -

ताज्या बातम्या