Saturday, April 26, 2025
Homeब्रेकिंग न्यूजदुर्दैवी : बिबट्याच्या हल्ल्यात सतरा वर्षीय युवकाचा मृत्यू

दुर्दैवी : बिबट्याच्या हल्ल्यात सतरा वर्षीय युवकाचा मृत्यू

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी तालुक्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी शिवारात एका सतरा वर्षीय युवक बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

वनारवाडी येथील सतरा वर्षीय युवक विठ्ठल भीमा पोतदार हा गाई चारण्यासाठी वनारवाडी शिवारातील खंडेराव डोंगराच्या कपारीकडेगेलेला होता. संध्याकाळी सहाच्या सुमारास घराकडे परततांना विठ्ठल पोतदार त्याच्यावर अचानक हल्ला केला. या त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. घटना समजतात गावातील सामाजिक कार्यकर्ते बाळू भेरे यांनी वनविभागाला या संदर्भात माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी अशोक काळे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी उपस्थित झाले. सदर मृत्यू हा बिबट्याच्या हल्ल्यातून झाल्याची खात्री करून युवकाचा मृतदेह दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी देण्यात आला.

याआधीही कुत्रे, वासरांवर बिबट्याने हल्ला केलेला होता. यासंदर्भात वनविभागाला कळवून देखील आवश्यक ती दखल वन विभागाने घेतली नाही . आणि आज एका युवकाचा बळी गेला आहे. आता तरी वन विभागाने ठोस भूमिका घेत या बिबट्यांपासून नागरिकांचे संरक्षण करावे.- बाळू भेरे, सामाजिक कार्यकर्ते,वनारवाडी

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या