Tuesday, March 25, 2025
Homeनगरसातवा वेतनचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय माघार नाही

सातवा वेतनचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय माघार नाही

साफसफाई, आरोग्य सेवा बंद || कर्मचार्‍यांची निदर्शने

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर महानगरपालिका कर्मचार्‍यांचा सातवा वेतन आयोगाच्या प्रश्नासाठी मनपा कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा काल, सोमवारी आठवा दिवस होता. उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे. दरम्यान, महापालिकेत कर्मचार्‍यांनी सोमवारी जोरदार निदर्शने केली. त्यांनी सकाळपासून साफसफाई व आरोग्य सुविधा बंद ठेवली होती. सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.

- Advertisement -

महानगरपालिका कर्मचार्‍यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी महापालिका कर्मचारी युनियनच्यावतीने उपोषण सुरू केले असून सोमवारी आठव्या दिवशी उपोषण करते बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, बाबासाहेब राशिनकर यांची तब्येत खालावली असून कर्मचार्‍यांनी महापालिकेत निदर्शने केली. यावेळी साफसफाई व आरोग्य सुविधाचे काम बंद ठेवण्यात आले होते. शासनाने अजूनपर्यंत निर्णय घेतला नाही त्यामुळे चिंतेचा विषय बनला आहे. निर्णय झाला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे केले जाईल, उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली असून गंभीर बनत चालले आहे, आम्ही लोकशाही मार्गाने आमचा हक्क मागत आहोत, या आंदोलनामध्ये काही अनुचित घटना घडली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल, आता आम्ही सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय माघार घेणार नाही असा इशारा सचिव आनंद वायकर आणि अनंत लोखंडे यांनी दिला. यावेळी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...