Monday, August 17, 2026
Homeक्राईमKarjat : शिलाई मशिन योजनेच्या नावाखाली महिलांना गंडा

Karjat : शिलाई मशिन योजनेच्या नावाखाली महिलांना गंडा

कर्जत तालुक्यातील 439 बचतगटातील सदस्यांची 4 लाख 82 हजारांची फसवणूक

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

स्वयंरोजगाराचे आमिष दाखवून कर्जत तालुक्यातील तब्बल 439 बचत गटातील महिलांची 4 लाख 82 हजार 900 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिलाई मशिन योजनेच्या नावाखाली प्रत्येकीकडून 1100 रुपये उकळण्यात आले, मात्र एकाही महिलेला मशिन मिळाले नाही.
याप्रकरणी पंचायत समितीच्या सी.आर.पी. सरोज सुभाष सुतार (रा. राशीन) यांनी कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेत लेखी तक्रार दाखल केली आहे. सरोज सुतार या 2019 पासून सी.आर.पी. म्हणून बचत गटांना विविध शासकीय योजनांची माहिती देतात.

- Advertisement -

याच विश्वासाचा गैरफायदा घेत प्रशांत अडसूळ (रा. कोरेगाव) याने त्यांच्याशी संपर्क साधला. 7500 रुपयांत दोन शिलाई मशिन देतो. सध्या फक्त 1100 रुपये बुकिंगसाठी भरा, असे सांगून त्याने विश्वास संपादन केला. यानंतर सुतार व इतर महिलांनी तालुक्यातील 439 गरजू महिलांकडून पैसे गोळा करून एकूण 4 लाख 82 हजार 900 रुपये अडसूळकडे सुपूर्द केले. पैसे भरून अनेक महिने उलटूनही एकाही महिलेला शिलाई मशिन मिळाले नाही. पैसे परत मागितल्यावर आरोपीकडून टाळाटाळ केली जात असून फोनही उचलला जात नाही.

फसवणूक झाल्याची खात्री पटताच सरोज सुतार कर्जत पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे. दरम्यान, बचत गटातील महिला अत्यंत कष्टाने पैसे साठवतात. शिलाई मशिनमुळे उत्पन्न मिळेल या आशेवर अनेक महिलांनी उसने-पासने करून 1100 रुपये भरले होते. आरोपीला तात्काळ अटक करून पैसे परत मिळवून द्यावेत, अशी मागणी महिलांनी केली आहे.

ताज्या बातम्या

Accident News : दूध टँकर व दुचाकीचा अपघात; एक ठार

0
अकोले |प्रतिनिधी| Akole तालुक्यातील लिंगदेव येथील ठाकरवाडी परिसरात दुचाकी (Bike) आणि दूध टँकरमध्ये (Milk Tanker) जोरदार धडक होऊन भीषण अपघात (Accident) होवून दुचाकीस्वार जागीच ठार...