Wednesday, June 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूज'शबरी नॅचरल्स'चा डंका आता दिल्लीपर्यंत; केंद्रीय जनजातीय संचालक डॉ. वर्नाली डेका यांच्याकडून...

‘शबरी नॅचरल्स’चा डंका आता दिल्लीपर्यंत; केंद्रीय जनजातीय संचालक डॉ. वर्नाली डेका यांच्याकडून कौतुकाची थाप

नाशिक | जिमाका वृत्तसंस्था Nashik

- Advertisement -

“आदिवासी बांधवांच्या समृद्ध संस्कृतीला आणि त्यांच्या अपार कष्टाला ‘शबरी नॅचरल्स’ या ब्रँडने दिलेली जागतिक ओळख खरोखरच कौतुकास्पद आहे. शबरी महामंडळाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या कल्पक योजनांमुळे दुर्गम भागातील आदिवासींचे जीवनमान खऱ्या अर्थाने उंचावत असून, हा बदल कौतुकास्पद आहे,” असे गौरवपूर्ण उद्गार केंद्रीय जनजाती मंत्रालयाच्या संचालक डॉ. वर्नाली डेका (भाप्रसे) यांनी आज नाशिकमध्ये काढले. नाशिक जिल्ह्याच्या विशेष क्षेत्रभेटीदरम्यान त्या बोलत होत्या.

क्षेत्रभेटी नंतर नाशिकस्थित शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या कार्यालयाला त्यांनी भेट दिली. यावेळी आदिवासी विकास आयुक्त तथा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड उपस्थित होत्या. तसेच क्षेत्रभेटीप्रसंगी धरती आबा जनजातीय अभियानाचे सल्लागार सुर्यांश निगम, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक जयरेखा निकुंभ, व्यवस्थापक राजेश पवार तसेच विविध शेतकरी उत्पादक संस्थांचे अध्यक्ष तसेच संचालक उपस्थित होते.

डॉ. डेका यांचे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दलपतपूर येथे आगमन होताच संपूर्ण परिसर आदिवासी संस्कृतीमय झाला होता. स्थानिक आदिवासी बांधवांनी डफली आणि तारपा यांसारखी पारंपरिक वाद्ये वाजवत उत्साही वातावरणात त्यांचे स्वागत केले. तर, आदिवासी महिलांनी पारंपरिक नृत्यांचा ठेका धरत डॉ. डेका यांचे स्वागत केले. या स्वागत सोहळ्याने डॉ. डेका भारावून गेल्या आणि त्यांनी स्थानिक कलाकारांच्या कलेचे भरभरून कौतुक केले.

क्षेत्रभेटीदरम्यान डॉ. वर्नाली डेका यांनी दलपतपूर येथील दावलेश्वर शेतकरी उत्पादक संस्थेच्या काजू प्रक्रिया उद्योगाला भेट दिली. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या कर्ज सहाय्यातून उभा राहिलेला हा प्रकल्प आदिवासींच्या आर्थिक सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.

बागेतून कच्चा काजू तोडण्यापासून ते तो ‘शबरी नॅचरल्स’च्या मोहक आणि दर्जेदार वेष्टनात (Packaging) बंद होऊन ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापर्यंतचा सर्व तांत्रिक प्रवास त्यांनी अत्यंत कुतूहलाने जाणून घेतला. यावेळी त्यांनी प्रकल्पातील लाभार्थी आदिवासी बांधवांशी आणि महिलांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ आणि वाढलेला आत्मविश्वास पाहून डॉ. डेका यांनी समाधान व्यक्त केले. “जेव्हा एखादी संस्था इतक्या पारदर्शकतेने आणि तळमळीने काम करते, तेव्हा त्याचे सकारात्मक परिणाम थेट समाजमनावर उमटतात,” असेही त्या यावेळी म्हणाल्या.

शबरी नॅचरल्स आणि शबरी महामंडळ हे आता महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांसाठी प्रगतीचे दोन भक्कम आधारस्तंभ बनले आहेत, असे मत त्यांनी मांडले. या यशस्वी मॉडेलची दखल घेऊन केंद्रीय जनजाती मंत्रालय आगामी काळात या प्रकल्पांना अधिक गतीने पुढे नेण्यासाठी आणि नवीन तांत्रिक व आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

क्षेत्रभेटीनंतर डॉ. डेका यांनी नाशिक येथील शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली. यावेळी आदिवासी विकास आयुक्त तथा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड (भाप्रसे) यांनी त्यांचे स्वागत केले.

ताज्या बातम्या

संपादकीय : १० जुन २०२६ – मोदींची तपपूर्ती अन् ‘इंडिया’ची वज्रमूठ

0
भारतीय लोकशाही आज एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. एकीकडे सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) सलग तिसर्‍यांदा सत्ता स्थापन करून सुमारे...