दिल्ली | Delhi
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा बऱ्याच वर्षांनी ‘पठाण’ (Pathaan) या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एकीकडे त्याच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली असताना प्रदर्शित होण्याआधीच हा चित्रपट अनेक वादांमध्ये सापडला आहे.
त्यातच आता आसामचे मुख्यमंत्री हिमंत सरमांची प्रतिक्रियाही चर्चेत आली आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी शाहरुख खान कोण आहे? मी त्याला ओळखत नाही. राज्यातील जनतेने हिंदी नव्हे तर आसामी भाषेतील चित्रपटांची काळजी करावी, अशी प्रतिक्रिया दिली होती.
हिमंता बिस्वा शर्मा यांच्या या विधानानंतर आता शाहरुख खानने त्यांना रात्री दोन वाजता फोन केला आहे. रात्री दोन वाजता हिमंता शर्मा आणि शाहरुख खान यांच्यात चर्चा झाली आहे. याची माहिती खुद्द शर्मा यांनीच दिली आहे.
MBBS ची विद्यार्थिनी सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणाचं गूढ उकललं! जीवरक्षकानंच घेतला जीव
हिमंता बिस्वा शर्मा यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, “बॉलिवुड अभिनेते शाहरुख खान यांनी रात्री दोन वाजता फोन कॉल केला. रात्री दोन वाजता आमच्यात फोनवरून चर्चा झाली. गुवाहाटी येथे त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान झालेल्या घटनेबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम राज्य सरकारचे असल्याचे म्हणत मी त्यांना आश्वासित केले आहे. आम्ही याबाबत चौकशी करू तसेच आगामी काळात अशा घटना घडणार नाहीत, याची खबरदारी घेऊ.”
सुसंस्कृत पुण्यात चाललंय तरी काय? पुत्रप्राप्तीसाठी महिलेला खाऊ घातली मानवी हाडांची राख
‘पठाण’वरून का सुरू आहे वाद?
पठाणच्या ‘बेशरम रंग’ गाण्यात दीपिका पदुकोनने भगव्या रंगाची बिकिनी घातली आहे. त्यावर हिंदू समर्थकांनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते, भगवा हिंदू धर्माचे प्रतीक आहे. भगव्या सारख्या पवित्र रंगाचा वापर बिकिनी म्हणून करणे आम्ही कदापी मान्य करणार नाही, असे ते म्हणालेत. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेसह इतर हिंदुत्ववादी संघटनांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
दरम्यान या संपूर्ण वादावर अभिनेता शाहरुख खान डिसेंबर २०२२ मध्ये म्हणाला होता की, ‘आम्ही आनंदी आहोत. जग काय करते? आम्ही, तुम्ही आणि सकारात्मक लोक राहिले तर जग जिवंत राहील.’ ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून वाद वाढतच चालला आहे. यावर अनेक मंत्री आणि संघटनांनी त्या गाण्यासह चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली, तर अनेकांनी त्यांच्या निषेधार्थ पोस्टर जाळले.
“जोशीमठचं भूस्खलन थांबवून दाखवा, मग आम्हीही…”; शंकराचार्यांचं धीरेंद्र शास्त्रींना थेट चॅलेंज
तसेच गेल्या शुक्रवारपासून ‘पठाण’चे आगाऊ बुकिंग सुरू झाले असून ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’साठी चाहते उत्सुक आहेत. आगाऊ बुकिंग सुरू झाल्यापासून पठाणने कोट्यवधींची कमाई केली आहे. बहुतांश ठिकाणी पहिल्या-दुसऱ्या दिवसाचे शो हाऊसफुल्ल झाले असून रीलिजआधीच सिनेमाने कोट्यवधी कमावले आहेत. शनिवारपर्यंत सिनेमाने आगाऊ बुकिंगमधून १४ कोटींपेक्षाही जास्त रक्कम कमावल्याचे समोर आलेले. आता नवीन आकडेवारीच्या प्रतीक्षेत किंग खानचे चाहते आहेत.
शाहरुख, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर पठाण हा सिनेमा येत्या २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होतोय. या सिनेमातील ‘बेशरम रंग’, ‘झुमे जो पठाण’ ही गाणी तसंच ट्रेलरने सोशल मीडियावर आधीच धुमाकुळ घातला, सिनेमातील गाण्यामुळे वादही निर्माण झाला. त्यामुळे आता या पार्श्वभूमिवर सिनेमात काय पाहायला मिळते याकरता किंग खानचे चाहते उत्सुक आहेत.
अचानक ट्रॅक्टरसमोर येऊन उभा राहिला बिबट्या अन्…, पुढं जे घडलं ते थक्क करणारं
राजधानी पुन्हा हादरली! मद्यधुंद तरूणांनी तरुणीला ४ किमी फरफटवलं; हाडं तुटली, कपडे गळून गेले