Wednesday, December 4, 2024
HomeमनोरंजनJawan Box Office Collection : किंग खानचा बॉक्स ऑफीसवर बोलबाला; 'जवान'ने केली...

Jawan Box Office Collection : किंग खानचा बॉक्स ऑफीसवर बोलबाला; ‘जवान’ने केली सातव्या दिवशी तब्बल ‘इतक्या’ कोटींची कमाई

मुंबई | Mumbai

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘जवान’ (Jawan) हा चित्रपट 7 सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालत आहे…

- Advertisement -

पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. जवान हा चित्रपट भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. जवानाने पहिल्या दिवशी देशात जवळपास ७५ कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. जगभरात पहिल्या दिवशी १२५ कोटी रुपयांची कमाई केल्याचे सांगितले जात आहे.

मोठी बातमी! तब्बल १७ दिवसांनी मनोज जरांगेंनी सोडलं उपोषण; मुख्यमंत्र्यांची यशस्वी मध्यस्थी

तर तिसऱ्या दिवशी ८१ कोटींचा गल्ला कमावला आहे. रविवारनंतर सिनेमाच्या कमाईत घट होत असल्याचे बघायला मिळत होते. ‘जवान’ने रविवारी ८०.१ कोटींचा गल्ला कमवून इतिहास रचला आहे. तसेच सोमवारी सिनेमाच्या कलेक्शनमध्ये मोठी घसरण झाली आहे. सोमवारी या सिनेमाने ३२.९२ कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. तसेच मंगळवारी २६ कोटी रुपयांची कमाई या सिनेमाने केली होती.

राहुल नार्वेकरांनी घटनेशी द्रोह केला; संजय राऊतांचे टीकास्त्र

आता रिलीजच्या ७ व्या दिवशी ‘जवान’ने २३ कोटींचा गल्ला कमावला आहे. ७ दिवसांची एकूण कमाई आता ३६७.५८ कोटींवर येऊन पोहोचली आहे. लवकरच हा चित्रपट ४०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिककरांनो! ‘या’ दिवशी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद; ‘हे’ आहे कारण

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या