Tuesday, April 29, 2025
Homeनंदुरबारवेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने गरोदर महिलेचा मृत्यू

वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने गरोदर महिलेचा मृत्यू

शहादा – Shahada – ता.प्र :

वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने गरोदर महिला व तिच्या पोटातील जुळया बालकांपैकी एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील लक्कडकोट येथे घडली.

- Advertisement -

याप्रकरणी बेजबाबदारपणे वर्तन करत महिलेच्या मृत्युस कारणीभूत असणार्‍या वैद्यकीय अधिकारी व रुग्णवाहिका चालकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आ.राजेश पाडवी यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

दरम्यान, याप्रकरणी विधानसभेत तारांकीत प्रश्न उपस्थित करण्यात असल्याचेही सांगीतले.याबाबत आ.राजेश पाडवी यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहादा तालुक्यातील लक्कडकोट येथील प्रमिलाबाई युवराज वसावे या गरोदर मातेच्या उपचारासाठी रुग्णालयात जाण्याकरिता वेळेवर रुग्णवाहिका एमएच-14- सीएल 1058 मिळाली नसल्याने दुर्दैवाने मृत्यू झाला.

यास रुग्णवाहिका चालक राजू वाडीले व त्यावरील वैद्यकीय अधिकारी डॉ.कैलास पाटील जबाबदार आहेत. सदर महिलेला रुग्णालयात घेवून जाण्यासाठी तिच्या नातेवाईकानी 108 या रुग्णवाहिकेचे चालक व त्यावरील डॉक्टरांशी संपर्क साधला असता चालकाने प्रसंगाचे गांभीर्य न ओळखता मला यायला 1 ते 2 तास लागतील असे बेजबाबदारपणे वक्तव्य करुन डॉक्टर साहेब घरी आंघोळ करीत असल्याने त्यांना यायला उशीर लागेल असे सांगून वेळूकाढूपणा करत असल्याचे सिध्द झाले.

सदर गरोदर मातेच्या नातेवाईकांनी स्वीय सहाय्यक हेमराज पवार यांना संबंधीत घटनेबाबत माहिती दिली असता त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून स्वतः रुग्णवाहिकेजवळ जावून चौकशी केली, संबंधीत रुग्णवाहिका उभी असल्याचे आढळून आले.

रुग्णवाहिकेचा चालक हा रुग्णवाहिकेजवळ नसून बाजारात फिरतांना दिसून आला. संबंधीत नातेवाईकांनी गरोदर मातेस रिक्षाने लक्कडकोटहून म्हसावद येथे उपचारासाठी नेत असतांना ती रिक्षात प्रसुत होवून नवजात बालकाचा जन्म झाला.

सरकारी रुग्णालयात पोहचल्यावर डॉक्टरांनी तपासले असता योग्यवेळी उपचार न मिळाल्याने गरोदर माता व त्यांच्या गर्भात असलेले दुसरे बाळही मयत असल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.

108 रुग्णवाहिका तसेच संबंधीत डॉक्टर वेळेवर पोहचले असते तर दोन निष्पाप जीवांचा अंत झाला नसता. ही बाब अत्यंत निंदास्पद तसेच काळीमा फासणारी आहे. श्री.पवार यांनी रुग्णवाहिका चालक व डॉक्टर यांच्याशी संपर्क साधला असता दोघांनी समाधानकारक उत्तर देण्याऐवजी अपमानकारक व अरेरावीची भाषा वापरुन तुम्ही आमदारांचे पी.ए.असले तर काय झाले. आम्हाला वैयक्तीक कामे नाहीत का? असे सांगितले.

या सर्व प्रकाराला बेजबाबदार, अकार्यक्षम रुग्णवाहिका चालक व डॉक्टर हेच असून या दोघांच्या निष्काळजीपणामुळे दोन निष्पाप जीवांना प्राण गमवावा लागला. या प्रकरणाची चौकशी करुन चालक व डॉक्टरांना तत्काळ बडतर्फ करण्यात येवून त्यांच्यावर महिला व बाळाच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी विधानसभेत तारांकीत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आ.पाडवी यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजूरमध्ये आरोग्य विभाग अलर्ट मोडवर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अकोले तालुक्यातील राजूर गावात दूषित पाण्यामुळे काविळसह जलजन्य आजारांचा उद्रेक झाला असून या ठिकाणी आरोग्य विभागाकडून 35 पथके तैनात करण्यात आली आहेत....