Tuesday, June 25, 2024
Homeक्रीडाShaheen Afridi : शाहीन आफ्रिदी दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, Asia Cup नंतर होणार...

Shaheen Afridi : शाहीन आफ्रिदी दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, Asia Cup नंतर होणार निकाह

दिल्ली | Delhi

- Advertisement -

सध्या एशिया कप ( Asia Cup 2023 ) सुरु असून पाकिस्तानची टीम चांगला खेळ करताना दिसतेय. या स्पर्धेमध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान ( India Vs Pakistan ) यांच्यात सामना रंगणार आहे. दरम्यान आशिया कप संपल्यानंतर एक खेळाडू पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार असल्याचं समोर आलंय. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून पाकिस्तानचा गोलंदाज शहीन आफ्रिदी ( Shaheen Afridi ) आहे. आशिया कपनंतर शाहीन आफ्रिदी ( Shaheen Afridi ) पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

एका रिपोर्टनुसार, शाहीन आफ्रिदी आशिया कप फायनलच्या दोन दिवसांनंतर १९ सप्टेंबर रोजी पुन्हा लग्न करणार आहे. शाहीन आफ्रिदीच्या पहिल्या लग्नाला फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते. सोबतच, पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम आणि उपकर्णधार शादाब खानसारखे खेळाडूही या लग्नात दिसले. आता दुसऱ्यांदा शाहीन आणि अंशाला त्यांचे लग्न मोठ्या थाटामाटात करायचे आहे. शाहीनच्या लग्नाची बारात सेरेमीन १९ सप्टेंबरला होणार आहे तर त्यानंतर २१ सप्टेंबरला रिसेप्शन होणार आहे. यापूर्वी शाहीन आणि अंशाने या वर्षी फेब्रुवारीमध्ये लग्न केले होते.

शाहीन आफ्रिदी सध्या आशिया कपसाठी श्रीलंकेत आहे. सध्या आशिया कपचे सुपर-4 सामने खेळवले जात आहेत. हे सर्व सामने कोलंबोत होणार आहेत. पाकिस्तानचा संघ पुढील सामना १० सप्टेंबरला भारताविरुद्ध खेळणार आहे. सध्या आशिया कप 2023 मध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमध्ये शाहीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत ३ सामन्यात ७ विकेट घेतल्या आहेत, ज्यामध्ये भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याचे ३५ धावांत ४ विकेट्स घेतल्या होत्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या