Tuesday, March 25, 2025
Homeनगरशनैश्वर देवस्थानमध्ये लवकरच नवे विश्वस्त मंडळ

शनैश्वर देवस्थानमध्ये लवकरच नवे विश्वस्त मंडळ

विधानसभेत पारित अधिनियमानुसार निर्णय

शनिशिंगणापूर|वार्ताहर| Shani Shingnapur

विधानसभेत पारित अधिनियमाची अंमलबजावणी करून शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानमध्ये नवीन विश्वस्त मंडळ नेमणुकीचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सांगितले. शिर्डी येथील भाजपच्या अधिवेशनानिमित्त जिल्ह्यात दाखल झालेल्या अनेक मंत्री, नेत्यांनी शनिवारी शनिदेवाचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बीडच्या प्रकरणात जो कोणी पुराव्यानिशी दोषी असेल त्याची सुटका नाही.जनतेने आम्हाला राज्य करण्याची जी संधी दिली त्या संधीच सोनं करण्याची शनी देवाने शक्ती देवो अशी प्रार्थना केली असल्याचे ना. फडणवीस यांनी सांगितले.

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शनिशिंगणापूर येथे पाच वाजून 40 मिनिटांनी आगमन झाले. शनीदेवाची विधीवत पूजा करुन त्यांनी दर्शन घेतले. यावेळी जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार शिवाजीराव कर्डिले उपस्थित होते. राज्याचे महसूल मंत्री तथा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुटुंबासोबत शनिदर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील कारभाराबाबत चौकशी पूर्ण झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या संदर्भात गाव पातळीपासून राज्यपातळीपर्यंत असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या चर्चेनंतरच निवडणुका स्वबळावर की महायुती याचे गणित ठरवले जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर पक्षश्रेष्ठीच्या चर्चेनंतर प्रदेशाध्यक्ष पदाचा प्रश्न मार्गी लागणार आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, देवस्थानबाबत मंत्री बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. त्या अनुषंगाने विश्वस्त मंडळ बरखास्तीचा निर्णय अपेक्षीत आहे, अशी प्रतिक्रीया आ.विठ्ठलराव लंघे यांनी दिली. शनिवार शनी प्रदोष असल्याने शनिशिंगणापुरात आमदार, खासदार, मंत्री महोदय यांची दिवसभर दर्शनासाठी ये-जा चालू होती. ना. माधुरी मिसाळ, ना. जयकुमार रावल, शिक्षक मतदार संघाचे आमदार म्हात्रे यांनी दर्शनासाठी हजेरी लावली. अतिथींचे देवस्थानच्या वतीने स्वागत करण्यात आले. भाजपचे नेवासा संयोजक सचिन देसरडा, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, नेवासा शहराध्यक्ष मनोज पारखे, अंकुश काळे, ऋषी शेटे, प्रताप चिंधे, राजू दराडे, शिवा लष्करे, महेश नवले, अरुण चांदघोडे, बन्सी आवारे आदी उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...